मुंबई: मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे.आपल्या पत्नीचे दुसरीकडे अफेअर सुरू असल्याच्या संशयावरून हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 69 वर्षीय व्यंकटेश याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यावरून त्याने 56 वर्षीय पत्नीवर ॲसिड फेकले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील चौकशी पोलीस करत आहेत. तर व्यंकटेश तणीर या वृद्धाला पोलिसांनी अटक केली आहे. वडाळीटी पोलीस आणि व्यंकटेश विरोधात भारतीय दंड संविधान कलम 326 बी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
संशयातून केला ॲसिड हल्ला: या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आरगडे यांनी सांगितले की, ही धक्कादायक घटना 9 एप्रिलला घडलेली आहे. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला. पत्नीचे बाहेर दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू आहे असे त्याला वाटले. याच संशयातून व्यंकटेशने ॲसिड हल्ला केला. जे ॲसिड त्याने आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर फेकले ते कॉन्संट्रेटर ॲसिड होते. त्यामुळे महिलेचा चेहरा जळाला नाही. महिलेचा चेहरा थोडक्यात बचावला आहे. पती पत्नी घरी असताना या दोघांचे कडाक्याची भांडण सुरु झाले. तुझं बाहेर अफेअर असल्याचे आरोपी पती त्याच्या पत्नीला म्हणाला. त्याने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यावर अॅसिड हल्ला: या आधीही नवी दिल्ली येथील द्वारका जिल्ह्यातील मोहन गार्डन पोलिस स्टेशन परिसरात बुधवारी सकाळी बारावीच्या विद्यार्थ्यावर अॅसिड हल्ला झाला होता. या हल्ल्याचा तपास पोलिसांनी 12 तासांत लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी सचिन अरोरा, हर्षित अग्रवाल उर्फ हनी आणि वीरेंद्र सिंह उर्फ सोनू अशी त्यांची ओळख पटली आहे. सचिन आणि पीडित विद्यार्थिनीमध्ये पूर्वीपासून मैत्री होती. सप्टेंबरमध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यामुळे विद्यार्थिनीने सचिनकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. याचा राग येऊन आरोपींनी हा प्रकार केला होता.