ETV Bharat / state

Holi 2023: होळीसाठी मध्य रेल्वेच्या ९० विशेष गाड्या; गाड्यांचे बुकिंग आजपासून सुरू - होळीसाठी मध्य रेल्वेच्या ९० विशेष गाड्या

होळी या सणादरम्यान कोकण, उत्तर प्रदेश तसेच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने होळी सणासाठी ९० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी मध्य रेल्वे ८४ आणि पूर्व मध्य रेल्वे ६ गाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

special trains for Holi
मध्य रेल्वेच्या ९० विशेष गाड्या
author img

By

Published : Feb 24, 2023, 10:54 AM IST

मुंबई : मुंबई ते सुरतकल दरम्यान ६ होळी विशेष, दादर आणि बलिया गोरखपूर ३४ होळी विशेष, नागपूर आणि मडगाव दरम्यान १० हॉलिडे स्पेशल, लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर मडगाव, पुणे - दानापूर अजनी करमळी आणि पनवेल - करमळी दरम्यान अतिरिक्त ३४ होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. पूर्व मध्य रेल्वेने मुंबई आणि जयनगर दरम्यान ६ अशा एकूण ९० विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

समस्तीपूर द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट : लोकमान्य टिळक टर्मिनस ते समस्तीपूर द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष 01043 ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २ मार्च २०२३ आणि ५ मार्च २०२३ रोजी १२.१५ वाजता सुटेल आणि समस्तीपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.१५ वाजता पोहोचेल. 01044 विशेष ३ मार्च २०२३ आणि ६ मार्च २०२३ रोजी समस्तीपूर येथून २३.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०७.४० वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर या स्थानकांवर थांबेल.

पुणे ते दानापूर साप्ताहिक : पुणे ते दानापूर साप्ताहिक होळी विशेष 01123 गाडी ४ मार्च २०२३ रोजी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसर्‍या दिवशी ०४.३० वाजता पोहोचेल. 01124 विशेष ६ मार्च २०२३ रोजी सकाळी ०६.३० वाजता दानापूर येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी दौंड कॉर्ड मार्ग, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा या स्थानकांवर थांबेल.

पुणे ते अजनी साप्ताहिक विशेष : पुणे ते अजनी साप्ताहिक एसी सुपरफास्ट स्पेशल 01443 गाडी २८ फेब्रुवारी २०२३ ते १४ मार्च २०२३ पर्यंत दर मंगळवारी पुणे येथून १५.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.५० वाजता अजनी येथे पोहोचणार आहे. 01444 विशेष गाडी १ मार्च २०२३ ते १५ मार्च २०२३ पर्यंत दर बुधवारी अजनी येथून १९.५० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबेल.

मडगाव साप्ताहिक विशेष : लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव साप्ताहिक विशेष 01459 गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २६ फेब्रुवारी २०२३ ते १२ मार्च २०२३ पर्यंत दर रविवारी २२.१५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसर्‍या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल. 01460 विशेष मडगाव येथून २७ फेब्रुवारी २०२३ ते १३ मार्च २०२३ पर्यंत दर सोमवारी ११.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी या स्थानकांवर थांबेल.

पुणे ते करमळी साप्ताहिक विशेष : पुणे ते करमळी साप्ताहिक विशेष 01445 गाडी २४ फेब्रुवारी २०२३ ते १७ मार्च २०२३ पर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून १७.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता करमळी येथे पोहोचेल. 01446 विशेष गाडी २६ फेब्रुवारी २०२३ ते १९ मार्च २०२३ पर्यंत दर रविवारी ०९.२० वाजता करमळी येथून सुटेल आणि त्याच दिवशी २३.३५ वाजता पुणे येथे पोहोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकांवर थांबेल.

पनवेल - करमळी साप्ताहिक विशेष : 01447 गाडी २५ फेब्रुवारी २०२३ ते १८ मार्च २०२३ पर्यंत दर शनिवारी २२.०० वाजता पनवेल येथून सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता करमळी येथे पोहोचेल. 01448 विशेष गाडी २५ फेब्रुवारी २०२३ ते १८ मार्च २०२३ पर्यंत दर शनिवारी ०९.२० वाजता करमळी येथून सुटेल आणि त्याच दिवशी २०.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकांवर थांबेल. होळीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या सर्व गाड्यांचे बुकिंग आजपासून (२४ फेब्रुवारी) सुरू झाले आहे. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irct.co.inc.in या संकेतस्थळावर जाऊनही तिकीट बुकिंग करता येणार आहे. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी अधिकृत संकेतस्थळाला ला भेट द्या किंवा अ‍ॅप डाउनलोड करा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा : Holi Festival : होळीच्या निमित्ताने अधिक संख्येने धावणार लालपरी; कोकणात एसटीच्या जादा २५० बसेस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.