ETV Bharat / state

Omicron Patients in Mumbai : मुंबईत एकाच कंपनीत काम करणाऱ्या आठ जणांना बाधा; रुग्णांचा आकडा १३ वर - राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था पुणे

मुंबईत विदेश प्रवास केलेल्या व्यक्तीसह त्याच्या संपर्कातील सात जण अशा एकूण ८ नागरिकांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे निष्पन्न ( Omicron Patients found in Mumbai ) झाले आहे. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १३ झाली आहे.

file photo
file photo
author img

By

Published : Dec 15, 2021, 1:07 AM IST

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण ( Omicron Patients in Mumbai ) आढळून येत आहेत. मुंबईत विदेश प्रवास केलेल्या व्यक्तीसह त्याच्या संपर्कातील सात जण अशा एकूण ८ नागरिकांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे निष्पन्न ( Omicron Patients found in Mumbai ) झाले आहे. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १३ झाली आहे.

एकाच कंपनीत काम करणारे पॉजिटीव्ह -

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विदेश प्रवास केलेल्या एका नागरिकाला कोरोनाचे सदृश्य लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्या रुग्णाने विदेश प्रवास केल्याची माहिती सांगितल्यानंतर तातडीने त्याच्या समवेत मुंबईत एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या निकटच्या संपर्कातील सात जणांचीही कोविड चाचणी करण्यात आली. त्यात त्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र ते एसिम्प्टोमॅटिक आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व आठही जणांचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही, पुणे) ( National Institute of Virology, Pune ) येथे जीनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात या सर्वांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या आठपैकी फक्त एकच जण रुग्णालयात दाखल आहे. तर, या आठ पैकी एक जण मुंबई बाहेरील रहिवासी आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सात जण निगेटीव्ह -

दरम्यान, या आठही जणांची नुकतीच कोविड चाचणी केली असता, त्यातील सात जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर रुग्णालयात दाखल नागरिकाचा अहवालही उद्या अपेक्षित आहे. या रुग्णास अतिशय सौम्य लक्षणे आढळली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या आठही जणांच्या निकटच्या अन्य सहवासित व्यक्तिंची कोविड चाचणी केली असता ते सर्व निगेटिव्ह आढळले आहेत. असे असले तरी, निकटच्या संपर्कातील या सहवासितांची पुन्हा एकदा फॉलोअप चाचणी करण्यात येणार आहे.

रुग्णांचा आकडा १३ वर -

मुंबईत याआधी ओमायक्रॉनचे ५ रुग्ण आढळून आले होते. आता डिसेंबर महिन्यात परदेश प्रवास केलेला १ व त्याच्या संपर्कात आलेले ७ असे एकूण ८ जण ओमायक्रॉन पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १३ वर गेला आहे. आतापर्यंत ३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.