मुंबई - भारत आज ७३ वा स्वातंत्र्यता दिवस साजरा करत आहे. देशभरात याचा प्रचंड उत्साह असून अनेक ठिकाणी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. देशभक्तीचा उत्साह पसरवण्यासाठी व आपल्या स्वातंत्र्याचे ७३ वे वर्ष उत्साहाने साजरे करण्यासाठी मुंबईतील एच. आर. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चर्चगेट स्थानकाबाहेर फ्लॅशमोबचे आयोजन केले होते.
भारतीय तिरंगा अभिमानाने फडकवत व देशभक्तीच्या गाण्यांच्या तालावर हा फ्लॅशमोब केला आहे. मोठ्या संख्येने सर्व तरुण मंडळी या फ्लॅशमोबमध्ये सहभागी झाले होते. आज कॉलेजमध्ये सकाळी ध्वजारोहण होणार आहे. त्यावेळी विद्यार्थी प्रत्येक भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान करणार आहेत. भारताला स्वतंत्र मिळालं आहे आणि भारतात विविध पारंपरिक लोक एकमताने राहतात, हे आपल्या या कार्यक्रमातून दाखवणार आहेत.