मुंबई - गेल्या काही वर्षांपासून मुंबई उपनगरातील रेल्वे रुळाला तडे जाण्याचा घटनांमुळे सतत लोकल सेवा विस्कळीत होत होत्या. परिणामी प्रवाश्यांना कामावर जाण्यास उशीर होत होता. मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळाला तडे जाण्याच्या घटना शून्यवर आणण्यासाठी युद्धस्तरावर सुरु केले. नियमितपणे रेल्वे रुळाची देखभाल करण्यात येऊ लागल्यामुळे रुळाला तडे जाण्याच्या प्रकारात विक्रमी घट झाली. गेल्या सहा वर्षांत रेल्वे रुळांना तडे जाण्याच्या घटना 50 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
50 टक्क्यांनी कमी झाल्या घटना
उपनगरीय रेल्वेची वाहतूक विस्कळित होण्याची अनेक कारणे आहे. त्यातील एक कारण म्हणजे रेल्वे रुळाला तडे जाणे. मात्र, मध्य रेल्वेने गेल्या चार वर्षांत नियमित रुळाची देखभाल आणि मेगाब्लॉक काळात केलेल्या कामांमुळे यात 50 टक्क्यांनी घट झाली आहे. 2014ला रुळाला 62 वेळा तडे जाण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या तुलनेत 2019-20 मध्ये फक्त 26 घटना झाल्या आहेत. त्यामुळे उपनगरी लोकल सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाणसुध्दा कमी झाले आहे. तुलनेने लोकलचा प्रवास सुरक्षित झाला आहे.
या कारणांमुळे तडे जाण्याचा घटना कमी
मध्य रेल्वेकडून या घटना कमी करण्यासाठी नेहमीच रूळाची देखभाल केली जाते. कोरोना काळात वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केली आहेत. यात रेल्वे रुळाची दुरुस्ती, आणि इतर काम सुधारण्यास वेगवेगळ्या यंत्रांची मदत झाली आहे . रेल्वे रुळाच्या देखभालीसाठी बलास्कीनिंग मशीन, डिओमॅटिक ट्याम्पिंग मशीन आणि ट्रक रिलिंग मशीनच्या मदतीमुळे रुळाची स्थिती सुधारण्यासाठी मदत झाली. रेल्वे रुळाखालील स्लीपसुध्दा वेळोवेळी बदलविण्यात येत आहेत. खडी मशीनच्या माध्यमातून ट्रॅक ट्रेन ऑपरेशनसाठी व्यवस्थित राहील अशा स्लीप बनविल्या जात आहे. Ultrasonic Flaw Detection ही वेळेवर केले जात आहे . यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडे जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
सहा वर्षांत 252 वेळा तडे
मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर रेल्वे मार्ग 320 किलोमीटरचा आहेत. गेल्या सहा वर्षांत 252 वेळा रेल्वे रुळाला तडे जाण्याचा घटना घडल्या आहे. 2014- 15 ला 62 वेळा मध्य रेल्वे मार्गांवर रुळाला तडे गेले होते. गेल्या वर्षी फक्त 26 वेळा रुळाला तडे गेले आहेत. मात्र, रुळाला तडे जाण्याचा घटना प्रत्येक वर्षी कमी कमी होत जात आहे. 2019-20 मध्ये या घटना 50 टक्यांनी कमी झाल्या आहेत. या घटना शुन्य क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे.
-रेल्वे रुळाला तडे जण्याची आकडेवारी
वर्ष रेल्वे रुळाला तडे
________________
2014-15 – 62
2015-16- 56
2016-17 – 45
2017-18- 33
2018-19 – 30
2019-20- 26
________________
एकूण -252
________________
320 किली मीटर उपनगरीय मार्ग
मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून मध्य रेल्वे मार्गावर कसारा-खोपोलीपर्यंत तर हार्बरवर पनवेलपर्यंत उपनगरी रेल्वेसेवा चालते. मध्य रेल्वे मार्गावर लॉकडाऊनपूर्वी दिवसभरात 1774 फेर्या, मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर 856 फेर्या तर हार्बरवर 614 फेर्या होतात. ठाणे-वाशी या ट्रान्सहार्बर मार्गावर 262 फेर्या तर बेलापूर- उरण मार्गावर 40 फेर्या अशा एकूण 1774 लोकल फेर्या प्रत्येक दिवशी धावतात. तर मध्य रेल्वेच्या उपनगरी लोकलमधून रोज सुमारे 45 लाख पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहे. 320 किलीमीटर मध्य रेल्वेचा उपनगरीय रेल्वे रुळाला तडे जाण्याचे प्रमाण सर्वाधिक हिवाळ्यात असते. वातावरणातील बदलाचा फटका रेल्वे रुळांना बसतो. त्यामुळे हिवाळ्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे जाऊन लोकल सेवा विस्कळीत होते.