ETV Bharat / state

Financial Fraud With Contractor : दिवाळी बोनसनिमित्त नव्या करकरीत नोटांचा हव्यास भोवला; कंत्राटदाराला तब्बल 5 कोटींचा गंडा - जुन्या नोटा बदलवून नव्या नोटा देणे

कंत्राटदाराला जुन्या नोटा बदलून नव्या करकरीत नोटा देतो, (Giving new notes by exchanging old notes) अशी बतावणी करत तब्बल 5 कोटींचा गंडा घालण्यात आला (defrauding contractor of 5 crores) आहे. विशेष म्हणजे या कंत्राटदाराला दिवाळीत आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी नवीन नोटांची आवश्यकता होती. याचाच फायदा घेत ठगांनी बाबूजयेशसिंग ठाकूर यांना सहा कोटींना चुना लावला (Financial Fraud with Contractor Mumbai) आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime

Financial Fraud with Contractor Mumbai
कंत्राटदाराची फसवणूक
author img

By

Published : Nov 7, 2022, 7:13 PM IST

नवी मुंबई : बेलापूरमध्ये गुजरातमधील रस्ते कंत्राटदाराला जुन्या नोटा बदलून नव्या करकरीत नोटा देतो, (Giving new notes by exchanging old notes) अशी बतावणी करत तब्बल 5 कोटींचा गंडा घालण्यात आला (defrauding contractor of 5 crores) आहे. विशेष म्हणजे या कंत्राटदाराला दिवाळीत आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी नवीन नोटांची आवश्यकता होती. याचाच फायदा घेत ठगांनी बाबूजयेशसिंग ठाकूर यांना सहा कोटींना चुना लावला (Financial Fraud with Contractor Mumbai) आहे. विशाल विरोजा, मोईन कादरी, सुशांत कुलकर्णी अशी आरोपींची नावे असून इतरही काही अज्ञात व्यक्तींचा या गुन्ह्यात समावेश असल्याची माहिती बेलापूर पोलिसांनी दिली आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime, showing lure of issuing new notes currency

आरोपी फरार- यापैकी एका आरोपीला पकडले असून मुख्य आरोपी मोईन कादरीसह अन्य आरोपी फरार आहेत. अजय मिश्रा नावाचा व्यक्ती आपल्याला नेहमी नव्या नोटा द्यायचा असे कंत्राटदार असलेल्या ठाकूर यांनी सांगितले. ऑगस्टमध्ये ठाकूर यांनी नव्या नोटांसाठी मिश्राशी संपर्क साधला. मिश्राने ठाकूर यांची ओळख विशाल आणि विरोजाशी करून दिली. विशालचा मित्र आरबीआयच्या कोषागारात काम करत असल्याची बतावणी मिश्राने केली. मलाही दीड कोटी रुपयांच्या करकरीत नोटा हव्या आहेत. त्यामुळे आपण नोटा घेण्यासाठी नवी मुंबईला सोबतच जाऊ असे विरोजाने ठाकूर यांना सांगितले. ठाकूर आणि विरोजा २६ सप्टेंबरला बेलापूरला पोहोचले. तिथे त्यांना मोईन काद्री आणि सुशील कुलकर्णी भेटले.

नोटांची व्हॅन पाठविण्याची बतावणी करून फसवणूक- आपण आरबीआयचे कर्मचारी असल्याचे सांगत कुलकर्णी त्यांना बेलापूरमधील आरबीआयच्या कार्यालयाजवळ घेऊन गेला. तुम्ही बाहेर थांबा. मी नव्या नोटांनी भरलेली व्हॅन पाठवतो, असे सांगून कुलकर्णी तिथून निघून गेला. थोड्या वेळाने व्हॅन आली. ठाकूर यांनी नोटा दाखवण्याची मागणी केली. मात्र तसे केल्यास अडचण निर्माण होईल असे कारण कुलकर्णी याने दिले. त्यानंतर मोईन काद्री व्हॅनमध्ये बसला. ठाकूर आणि विरोजा यांची कार व्हॅनच्या मागून धावत होती. दोन्ही वाहने गुजरातच्या दिशेने जात असताना तळोजा येथे एका इनोव्हा कारने त्यांना ओव्हरटेक केले. इनोव्हामधील अज्ञातांनी व्हॅनच्या चालकाला धमकावत व्हॅन घेऊन पळ काढला. झाला प्रकार पाहून ठाकूर आणि विशाल घाबरले.

पोलिसांकडून तपास सुरू - त्यानंतर आरोपी काद्री त्यांना बीकेसीतील एका हॉटेलमध्ये भेटला. व्हॅन आणि कार आरबीआयच्या दक्षता पथकाने जप्त केल्याचे काद्रीने त्यांना सांगितले. तसेच कुलकर्णी हे सगळे प्रकरण व्यवस्थित सोडवेल, अशी खात्री त्याने ठाकूर यांना दिली. मात्र त्यानंतर काद्रीने ठाकूर आणि विशाल यांच्याशी संपर्कच तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठाकूर यांनी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.