मुंबई - मुंबईत कोरोना लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली. आतापर्यंत मुंबईत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. यांनंतर 1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी मुंबईत 48 हजार 152 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 21 लाख 28 हजार 95 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत गुरुवारी 48 हजार 152 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 26 हजार 162 लाभार्थ्यांना पहिला तर 21 हजार 990 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 21 लाख 28 हजार 095 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 18 लाख 14 हजार 389 लाभार्थ्यांना पहिला तर 3 लाख 13 हजार 706 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 71 हजार 1 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 7 हजार 608 फ्रंटलाईन वर्कर, 8 लाख 22 हजार 272 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 7 लाख 27 हजार 214 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
असे झाले लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 38 हजार 870 तर आतापर्यंत 13 लाख 84 हजार 486 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 6 हजार 424 लाभार्थ्यांना तर एकूण 1 लाख 62 हजार 670 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर गुरुवारी 2 हजार 858 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 5 लाख 80 हजार 939 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2,71,001
फ्रंटलाईन वर्कर - 3,07,608
जेष्ठ नागरिक - 8,22,272
45 ते 59 वय - 7,27,214
एकूण - 21,28,095