ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतून ४४२ उमेदवारांचे अर्ज - mumbai election news

निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी मुंबई शहरातील १० व उपनगरातील २६ असे एकूण ३६ विधानसभा मतदारसंघामधून सुमारे ४४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अशी माहिती मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

निर्वाचन आयोग
author img

By

Published : Oct 5, 2019, 11:37 AM IST

मुंबई - महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी मुंबई शहरातील १० व उपनगरातील २६ असे एकूण ३६ विधानसभा मतदारसंघामधून सुमारे ४४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याबाबतची माहिती मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मुंबई शहर विभागातील १० मतदारसंघात आज शेवटच्या दिवशी ७३ उमेदवारांनी ८८ उमेदवारी अर्ज भरले. मुंबई शहर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०७ उमेदवारांनी १४४ उमेदवारी अर्ज भरले आहेत. मुंबई उपनगर जिल्हात २६ मतदारसंघ आहेत. यात विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात काल २२७ नामांकन दाखल झाले. आतापर्यंत एकूण ३३५ उमेदवारांचे नामांकन दाखल झाले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर अशा दोन्ही जिल्ह्यांमधून सुमारे ४४२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

हेही वाचा- 'आरे'तील वृक्षतोड बेकायदेशीर नाही का? बॉलिवूडकरांनी व्यक्त केला संताप

मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून नेमकी आकडेवारी येणे बाकी आहे. ही आकडेवारी रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यात असल्याने उमेदवारांची नेमकी आकडेवारी रात्री उशिरानंतर येऊ शकेल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. या छाननीमध्ये अनेक उमेदवार कमी होणार आहेत. ७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर मुंबईमधून किती उमेदवार निवडणूक लढवतात हे निश्चित होणार आहे.

हेही वाचा- मेट्रो कारशेडसाठी रात्रीच्या अंधारात ३०० झाडांवर कुऱ्हाड.. पर्यावरणप्रेमींचा संताप

निवडणूक कार्यक्रम

राज्यात २७ सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना जारी झाली आहे. तेव्हापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर होती. राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. २७ ऑक्टोबरला राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. चालू विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरला संपत आहे.

Intro:मुंबई - महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी आजच्या शेवटच्या दिवशी मुंबई शहरातील १० व उपनगरातील २६ अशा एकूण ३६ विधानसभा मतदार संघामधून सुमारे ४४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अशी माहिती मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. Body:मुंबई शहर विभागातील १० मतदार संघात आज शेवटच्या दिवशी ७३ उमेदवारांनी ८८ उमेदवारी अर्ज भरले. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण आतापर्यंत १०७ उमेदवारांनी १४४ उमेदवारी अर्ज भरले आहेत. मुंबई उपनगर जिल्हात २६ मतदार संघ आहेत. यात विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात आज २२७ नामांकन दाखल. आतापर्यंत एकुण ३३५ उमेदवारांचे नामांकन दाखल झाले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर अशा दोन्ही जिल्हांमधून सुमारे ४४२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदार संघ आहेत. या मतदारसंघातून नेमकी आकडेवारी येणे बाकी आहे. ही आकडेवारी रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यात असल्याने नेमका उमेदवारांची नेमकी आकडेवारी रात्री उशीरानंतर येऊ शकेल असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. या छाननीमध्ये यामधील अनेक उमेदवार कमी होणार आहेत. ७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर मुंबईमधून किती उमेदवार निवडणूक लढवतात हे निश्चित होणार आहे. 

निवडणूक कार्यक्रम - 
राज्यात २७ सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना जारी झाली आहे. तेव्हापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर होती. राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. २७ ऑक्टोबरला राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे.    

बातमीसाठी निवडणुक आयोगाचा फोटो वापरावा Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.