ETV Bharat / state

Mumbai Cardila cruise : कार्डिला क्रूझमधील 60 पैकी 41 पॉझिटिव्ह प्रवासी क्वारंटाईन

author img

By

Published : Jan 5, 2022, 3:27 PM IST

गोव्याहून मुंबईत आलेल्या कार्डिला क्रूझवरील ( Cardilla Cruise from Goa to Mumbai ) 60 कोरोना पॉजिटीव्ह प्रवाशांपैकी 41 प्रवाशांना विविध कोविड सेंटर आणि हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले. याबाबत मुंबई पालिका प्रशासनानी माहिती ( Mumbai Municipal Administration Information ) दिली आहे.

Cardila cruse
कार्डिला क्रूझ

मुंबई : मुंबईहून गोव्याला गेलेले आणि काल पुन्हा मुंबईत कार्डिला क्रूझ ( Mumbai Cardilla Cruise ) आले आहे. या कार्डिला क्रूझमधील ६० पैकी ४१ पॉझिटिव्ह प्रवाशांना क्वारंटाईन केले आहे. या रुग्णांना भायखळा येथील रीचर्डसन, क्रुडास जम्बो कोविड केंद्र ( Krudas Jumbo Covid Center ) आणि इतर विविध हॉटेल्समध्ये दाखल केले आहे. जहाजावरील एकूण १ हजार ८२७ प्रवाशांची कोविड तपासणी करून, त्यांच्या स्वॅबचे नमुने २ वैद्यकीय प्रयोगशाळेमार्फत घेण्यात आले आहेत. या सर्व प्रवाशांचे चाचणी अहवाल आज दुपारपर्यंत येणार असल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांना घेऊन कार्डिला क्रूझ गोव्याला गेली होती. गोव्यात गेल्यावर या क्रूझमधील प्रवाशांची चाचणी केली. त्यामधील काही प्रवासी पॉझिटिव्ह आल्याने क्रूझमधील प्रवाशांना पाण्यातच क्वारंटाईन केले होते. काल मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कार्डिला क्रूझ मुंबईच्या ग्रीन गेट येथे आले. पालिकेने क्रूझमधील प्रवाशांची चाचणी केली. त्यामधील ६० प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह ( 60 passenger corona positive ) आले आहेत. या पॉझिटिव्ह प्रवाशांना पालिकेने १७ सीटर ५ ऍबुलन्सच्या माध्यमातून भायखळा येथील रिचर्ड अँड कृडास जंबो कोविड सेंटरमध्ये ( Krudas Jumbo Covid Center) दाखल केले. तसेच प्रवाशांच्या आर्थिक परिस्थितीनुसार हॉटेलमध्ये ही क्वारंटाईन केले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

७ दिवस क्वारटाईन -

क्रूझवरील इतर प्रवाशांना आरटीपीसीआर चाचण्या करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रवाशांना त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याशिवाय क्रूझच्या बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. क्रूझवरील प्रवाशांचा अहवाल उद्या सकाळी येणार आहेत. त्यापैकी ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येतील त्यांना घरी पाठवून ७ दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगितले जाणार आहे.

या ठिकाणी केले क्वारंटाईन -

भायखळा रिचर्ड्स ऍण्ड क्रुडास - १
सेंट जॉर्ज हॉस्पिटल - १
अंधेरी स्वेन्स्का हॉटेल - २
अंधेरी टी २४ रेट्रो - २
अंधेरी विट्स - ६
अंधेरी सनसिटी रेसिडेन्सी - ६
अंधेरी सनसिटी प्रीमियर - ६
फोर्ट सुबा हॉटेल २
फोर्ट सी पॅलेस - ५
अंधेरी पॅसिफिक रेसिडेन्सी - १
अंधेरी मुंबई इंटरनॅशनल - ३
एकूण - ४१

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.