ETV Bharat / state

पूरग्रस्तांसाठी ३७२ निवारा केंद्रांची उभारणी; ४ लाख पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश - राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष

पश्चिम महाराष्ट्रातील पुरामध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी,रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील ७० तालुके बाधीत झाले आहेत. ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.आत्तापर्यंत ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे.

४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश
author img

By

Published : Aug 11, 2019, 11:59 PM IST

मुंबई - पूर परिस्थितीमध्ये ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत ४ लाख ४८ हजार नागरिकांना हलवण्यात आले आहे. या पूरबाधित नागरिकांसाठी ३७२ तात्पुरते 'निवारा केंद्र' सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३२ पथकांसह आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्डची एकूण १०५ बचाव पथके कार्यरत असल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.

४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश
४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ५४ तर सांगली जिल्ह्यात ५१ पथके आहेत. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर,सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत.राज्यातील १० जिल्ह्यांमधील ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ४५ हजार तर सांगली जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार नागरिकांचा समावेश आहे.पूरबाधित जिल्ह्यांमध्ये २२६ बोटींद्वारे नागरिकांना हलविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. विस्थापित नागरिकांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांमध्ये नागरिकांना अत्यावश्यक सोईंसह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.पूर परिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी,रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके बाधीत झाले आहेत. बाधीत गावांची संख्या ७६१ इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Intro:Body:mh_mum_4_pur_cm_vis_7204684

पूरबाधितांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्रे- राज्य आपत्ती नियंत्रण विभागाची माहिती

४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

आपत्ती व्यवस्थापन दलाची १०५ बचाव पथके कार्यरत

मुंबई: पूरपरिस्थितीत ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ४८ हजार नागरिकांना हलविण्यात आले असून या पूरबाधित नागरिकांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३२ पथकांसह आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्डची एकूण १०५ बचाव पथके कार्यरत असल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ५४ तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर,सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत.

राज्यातील १० जिल्ह्यांमधील ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ४५ हजार तर सांगली जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार नागरिकांचा समावेश आहे.

पूरबाधित जिल्ह्यांमध्ये २२६ बोटींद्वारे नागरिकांना हलविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. बाधीत नागरिकांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी नागरिकांना अत्यावश्यक सोईंसह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पूरपरिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी,रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके बाधीत झाले आहेत. बाधीत गावांची संख्या ७६१ इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.