ETV Bharat / state

मुंबईकरांची मोनोकडे पाठ; सोमवारी फक्त 350 प्रवाशांचा प्रवास - mono railway peoples response

सोमवारी दुसऱ्या दिवशीही मुंबईकरांनी मोनोतून प्रवास करण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसले. सोमवारी फक्त 350 प्रवाशांनी मोनो रेलमधून प्रवास केला.

mono rail, mumbai
मोनो रेल, मुंबई
author img

By

Published : Oct 20, 2020, 2:26 AM IST

Updated : Oct 20, 2020, 9:45 AM IST

मुंबई - रविवारपासून देशातील पहिली-वहिली चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल सेवेत दाखल झाली आहे. रविवारी पहिल्या दिवशी मोनोला थंड प्रतिसाद मिळाला. तर सोमवारी दुसऱ्या दिवशीही मोनो तुरळक प्रवाशांना घेऊनच ये-जा करत होती. सोमवारी दिवसभरात केवळ 350 जणांनी मोनो रेल्वेतून प्रवास केला आहे. हा आकडा खूपच कमी आहे. मात्र, येत्या काळात लोकांचा प्रतिसाद वाढेल, अशी आशा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) व्यक्त केली आहे.

19.50 किमीचा चेंबूर-जेकब सर्कल मोनो मार्ग सुरू झाल्यापासून मुंबईकरांनी मोनोकडे पाठ फिरवली आहे. अनेकदा मोनोच्या काही फेऱ्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या प्रवाशांना घेऊन जाताना दिसते. चेंबूर ते वडाळा हा एक टप्पा आधी सुरू झाला. तर वडाळा ते जेकब सर्कल टप्पा नंतर सुरू झाला. पहिल्या टप्प्याला लोकांचा प्रतिसाद कमी असला तरी संपूर्ण चेंबूर ते जेकब सर्कल टप्पा पूर्ण झाल्यास प्रतिसाद वाढेल, असा दावा एमएमआरडीएकडून केला जात होता. मात्र, त्यानंतरही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच मोनोला दररोज लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. म्हणून हा प्रकल्प आणखी तोट्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कधी आग लागल्यामुळे तर कधी तांत्रिक अडचणीमुळे मोनो महिनो-महिने बंद पडलेली मुंबईकरांनी पाहिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मोनो बंद पडणे यात काही विशेष नसल्याचे म्हटले जात आहे. तरी लॉकडाऊनमध्ये 7 महिने मोनो बंद राहिल्याने मोनोचे नुकसान झाले आहे. आता मात्र मोनो सुरू झाली आहे. मोनोच्या सध्या केवळ 30 फेऱ्या होत आहेत. दरम्यान, एका मोनो गाडीची प्रवासी क्षमता 350 हुन अधिक असताना आज दिवसभरात 350 जणांनी मोनोने प्रवास केला आहे. हा आकडा निराशाजनक असल्याची चर्चा आहे.

Last Updated : Oct 20, 2020, 9:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.