मुंबई: राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मुंबईसह राज्यांमध्ये इन्फ्लुएंजा या व्हायरस बरोबरच कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही गेल्या काही दिवसात वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या 343 रुग्णांची तर 3 मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत 86 रुग्णांची नोंद झाली असून 20 रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात 3 रुग्णांचा मृत्यू : राज्यात 24 मार्च रोजी 343 रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात 1 तर ठाणे महापालिका हद्दीत 2 अशा एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1763 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 81 लाख 41 हजार 020 रुग्णांची नोंद झालेली आहे, त्यापैकी 79 लाख 90 हजार 824 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 48 हजार 433 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत 20 रुग्ण ऑक्सिजनवर : मुंबईत आज 86 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 453 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या तीन वर्षात एकूण 11 लाख 56 हजार 156 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 11 लाख 35 हजार 956 रुग्ण बरे झाले असून 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या 4250 पैकी 33 खाटांवर रुग्ण आहेत. 20 रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
इन्फ्लुएंझाचे 716 रुग्ण : 1 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत इनफ्लुएंजाच्या एच 1 एन 1 चे 427 तर एच 3 एन 2 चे 289 असे एकूण 716 रुग्ण आढळून आले आहेत. एच 1 एन 1 च्या 3 तर एच 3 एन 2 च्या एका मृत्यूची नोंद झाली आहे. एच 3 एन 2 मुळे 3 संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. तर राज्यात एकूण 1763 सक्रिय रुग्ण आढळले आहेत.
हेही वाचा: Corona Patient कोविडने डोके वर काढले राज्य सरकार अलर्ट मोडवर