ETV Bharat / state

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 342 कोटी जमा; कोरोना रुग्णांसाठी खर्च मात्र 23.82 कोटी

author img

By

Published : May 31, 2020, 9:49 PM IST

18 मे 2020 पर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एकूण 342.01 कोटी रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने कोविड-19 साठी जमा केलेल्या एकूण रक्कमेपैकी केवळ 7 टक्के रक्कम ही आरोग्य सेवांवर खर्च केली आहे. प्रवासी, कामगारांच्या रेल्वे तिकिटावर 16 टक्के आणि रेल्वे अपघातग्रस्तांवर 0.23 टक्के रक्कम खर्च केली गेली आहे. आजही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 262.28 कोटी रुपये शिल्लक आहेत.

Chief Minister
मुख्यमंत्री

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णांना सोयीसुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 342 कोटी रुपये जमा झाले. मात्र, त्यापैकी अवघे 23.82 कोटी रुपये कोरोनासाठी खर्च झाले आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 342 कोटी जमा

18 मे 2020 पर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एकूण 342.01 कोटी रुपये जमा झाले आहेत. या रकमेतून एकूण 79 कोटी 82 लाख 37 हजार 70 रुपये इतका खर्च झाला आहे. खर्च झालेल्या रकमेपैकी केवळ 23 कोटी 82 लाख 50 हजार रुपये कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च झाले आहेत. यातील 20 कोटी रुपये सेंट जॉर्ज हॉस्पिटल देण्यात आले असून 3 कोटी 82 लाख 50 हजार रुपये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला देण्यात आले आहेत.

स्थलांतरित मजुरांचे रेल्वे भाडे देण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यात 53 कोटी 45 लाख 47 हजार 70 रुपये इतकी रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील मजुरांसाठी 1.30 कोटी रुपये तर सांगली जिल्ह्यातील मजुरांसाठी 44.40 लाख रुपये देण्यात आले आहेत. औरंगाबाद येथील रेल्वे अपघातातील मृत मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपये याप्रमाणे 80 लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात आली आहे.

अनिल गलगली यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने कोविड-19 साठी जमा केलेल्या एकूण रक्कमेपैकी केवळ 7 टक्के रक्कम ही आरोग्य सेवांवर खर्च केली आहे. प्रवासी, कामगारांच्या रेल्वे तिकिटावर 16 टक्के आणि रेल्वे अपघातग्रस्तांवर 0.23 टक्के रक्कम खर्च केली गेली आहे. आजही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 262.28 कोटी रुपये शिल्लक आहेत.

महानगरपालिका आणि शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील रक्कम खर्च करावी. जनतेने दिलेली मदत योग्य कामात वापरली गेल्याचे समाधान जनतेला मिळेल, अशी मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.