मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना फोनवरून धमकी (Sharad Pawar threatened) देणाऱ्या आरोपी नारायण कुमार सोनी याला आज मुंबईतील गिरगाव कोर्टात (Mumbai Girgaon Court) हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आरोपीची चौकशी करण्याकरिता पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत आरोपीला तीन दिवसांची 16 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत (Police custody sought) रवानगी केली आहे. (Latest news from Mumbai) गावदेवी पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला होता. (Mumbai Crime)
पवारांनी जीवे मारण्याची धमकी : शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी वारंवार धमकीचे फोन करणाऱ्या बिहारमधून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आज आरोपीला बिहारमधून मुंबईत आणल्यानंतर गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सोनी हा गेल्या तीन चार महिन्यांपासून पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर फोन करत होता. मुंबईतील सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी फोन करून देण्यात आलेल्या धमकी प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपासात नारायण कुमार सोनी याने धमकीचा फोन केल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
देशी कट्ट्याने मारण्याची धमकी : सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी फोन करून देशी कट्ट्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी 2 डिसेंबर रोजी पवार यांच्या कार्यालयाकडून मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सिल्व्हर ओकवर तैनात असलेल्या पोलिसांच्या फोन ऑपरेटरने दिलेल्या माहितीनुसार गावदेवी पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात भादंवि कलम 294, 506 (2)अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला होता.