ETV Bharat / state

विना मास्क मुंबईकरांवर कारवाई; ५८ कोटी ४२ लाखाचा दंड वसूल - Action of Mumbai Municipal Corporation

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २० एप्रिल २०२० पासून कारवाई केली जात आहे. आतापर्यंत एकूण २९ लाख २ हजार ८८ नागरिकांवर कारवाई करत ५८ कोटी ४२ लाख ९९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईकरांवर कारवाई ५८ कोटी ४२ लाखाचा दंड वसूल

author img

By

Published : Jun 24, 2021, 2:06 PM IST

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता, मार्च २०२० पासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अंमलात आणलेल्या आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असल्याने मास्कचा वापर करावा, असे आवाहन सरकार आणि पालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही अनेक नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. विनामास्क नागरिकांवर, रेल्वे प्रवाशांवर, पालिका, क्लिनअप मार्शल तसेच पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. २० एप्रिल २०२० पासून आतापर्यंत २९ लाख २ हजार ८८ नागरिकांवर कारवाई करत ५८ कोटी ४२ लाख ९९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईकरांवर कारवाई ५८ कोटी ४२ लाखाचा दंड वसूल
मुंबईकरांवर कारवाई ५८ कोटी ४२ लाखाचा दंड वसूल

५८ कोटी ४२ लाखांचा दंड वसूल
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २० एप्रिल २०२० पासून कारवाई केली जात आहे. आतापर्यंत एकूण २९ लाख २ हजार ८८ नागरिकांवर कारवाई करत ५८ कोटी ४२ लाख ९९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पालिकेची कारवाई
मुंबई महापालिकेने आतापर्यंत २४ लाख ९६ हजार ८२६ नागरिकांवर कारवाई केली आहे. या कारवाई मधून ५० कोटी २९ लाख ८६ हजार २०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.

पोलिसांची कारवाई
मुंबई पोलिसांनी ३ लाख ८१ हजार ३७१ नागरिकांवर कारवाई करत ७ कोटी ६२ लाख ७४ हजार २०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. पोलिसांनी जो दंड वसूल केला आहे त्यापैकी ५० टक्के दंड पोलीस विभागाला तर ५० टक्के दंड महापालिकेला दिला जाणार आहे.

रेल्वेतील कारवाई
फेब्रुवारीपासून मुंबईमध्ये सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. तेव्हापासून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वमधून प्रवास करणाऱ्या विना मास्क प्रवाशांवर करावाई केली जात आहे. आतापर्यंत रेल्वेमध्ये २३ हजार ८९१ प्रवाशांवर कारवाई केली, त्यातून ५० लाख ३९ हजार २०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा- भाजीपाला - फळ विक्रेत्यांना मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला मास्क लावण्याचा सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.