- कोल्हापूर -
गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या 24 तासांपासून तर जिल्ह्यात धुवांधार पाऊस सुरू असून पंचगंगेच्या पाण्यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 46.01 फुटांवर आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पंचगंगा नदी आणखीनच रौद्र रूप घेण्याची शक्यता आहे. धोका पातळी पेक्षाही 3 फूट वरून पंचगंगा नदी वाहू लागली असल्याने आता चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील नागरिकांना स्थलांतरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापुर जिल्ह्यात सध्या 2 एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्या चिखली गावात त्यांनी गुरुवारी रात्रीपासूनच नागरिकांचे स्थलांतर केले आहे.
सविस्तर वाचा... - सांगली -
सांगली - कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी शुक्रवारी 40 फुटांवर जाण्याचे अंदाज पाटबंधारे प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून शहरातल्या पूर पट्ट्यातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश जारी केले आहेत.
सविस्तर वाचा... - रायगड -
महाड तळई गावात दरड कोसळली आहे. यात जवळपास 400 ते 500 नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात विविध तीन घटनांमध्ये लहान मुलींसह तीन जण पाण्यात वाहून गेले आहेत. ही माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. एनडीआरएफ, कोस्ट गार्ड पथक पुराच्या पाण्यात अडकल्याने बचावकार्यास वेळ लागणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. तरीही पाऊस कमी झाल्यानंतर बचाव कार्य सुरू होईल. पावसाचा जोर अजून सुरू असल्याने बचावकार्याला वेळ लागण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा... - रत्नागिरी -
चिपळूणमध्ये पुराने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी यापूर्वी कधी पाणी आले नव्हते, अशा ठिकाणी देखील यावर्षी पुराचे पाणी भरले. चिपळूण शहरातील पागमळा परिसरात यापूर्वी कधी एवढे पाणी आले नव्हते. मात्र, यावर्षी हा भाग जलमय झालेला आहे.
सविस्तर वाचा... - पुणे -
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. २४ तासांपासून भीमाशंकर परिसरात पाऊसाची तुफान बँटिंग झाली आहे. मंदिराच्या बाजुच्या डोंगरातून आलेले पाणी मंदिरात पोहोचले आहे. मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळून मंदिरात आला आहे.
सविस्तर वाचा... - नाशिक -
आपल्या जवळ श्रवणभक्ती असेल तर आपण भाषेवर प्रभुत्व मिळू शकतो. भाषेवर प्रभुत्व मिळवले की कोणत्याही क्षेत्रात आपल्याला मोठ्या प्रमाणात संधी आहेत असे निवृत्त आकाशवाणी निवेदक हृषीकेश अयाचित यांनी सांगितले आहे. 23 जुलै हा दिवस राष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात 1927 साली मुंबई आणि कोलकत्ता या दोन ठिकाणाहून खाजगी कंपनी अंतर्गत प्रसारणास सुरुवात झाली. 1930 मध्ये सरकारने ट्रान्समिटर प्रसारण सेवा स्वतःच्या ताब्यात घेतली. 1935 मध्ये यास भारतीय प्रसारण सेवा असे नाव देण्यात आले.
सविस्तर वाचा... - रायगड -
महाड तळई गावात दरड कोसळली आहे. यात जवळपास ५० ते ६० नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात विविध तीन घटनांमध्ये लहान मुलींसह तीन जण पाण्यात वाहून गेले आहेत. ही माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
सविस्तर वाचा... - मुंबई -
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यवसायिक राज कुंद्रा याच्या अटकेनंतर पोर्नोग्राफी गुन्ह्यातील रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुत्राच्या माहितीनुसार राज कुंद्राने मागील दीड वर्षात 100 हून अधिक पॉर्न सिनेमा बनविले आहेत. त्यामधून त्याची कोट्यवधी रुपयांची कमाई झाली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा याला अटक केली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात कुंद्रा अटकेत आहे. 23 जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याच काळात पोलिसांनी राज कुंद्रा याच्याशी निगडित असणाऱ्या ठिकाणांवर धाडी टाकले आहेत. या धाड सत्रात काही थक्क करणारे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचे कळते.
सविस्तर वाचा... - मुंबई -
पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तूकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पुरपरिस्थती निर्माण झाली. तसेच रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
सविस्तर वाचा... - बंगळुरू (कर्नाटक) -
राज्यात भाजप सरकार स्थापन होऊन दोन वर्ष झाल्यानंतर आता नेतृत्त्वबदलाचे संकेत आहेत. भाजपच्या पक्षश्रेष्टींकडून कोरोनाची तिसऱ्या लाटेचे संकट पाहता लवकरात मुख्यमंत्री येदियुरप्पांकडून राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. 26 जुलैला राज्यातील भाजप सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यानंतर आता भाजप मुख्यमंत्रीपदासाठी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नविन चेहऱ्याच्या शोधात आहेत. नविन नेत्याला संधी दिल्यास पुढच्या निवडणुकांमुळे संघटन आणखी मजबूत होऊ शकते, असा पक्षाचा आग्रह आहे. भविष्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतृत्व बदल करण्यात येत आहे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
सविस्तर वाचा...
Top 10 @ 11 AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या.. - maharashtra rains live
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना, पाऊस यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Last Updated : Jul 23, 2021, 11:50 AM IST