ETV Bharat / state

Mumbai Metro: वडाळा ते सीएसएमटी मेट्रो मार्ग लवकर पुर्ण होणार, कारभार एमएमआरसिएलकडे वर्ग - 2 projects in the hands of MMRCL

शिंदे फडणवीस शासनाने मुंबईत सर्व मेट्रो प्रकल्पाच्या मंजुरी दिली.आता ठाणे ते मुंबई मेट्रो मार्गासाठी एमएमआरडीएकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासोबत महामुंबई मेट्रो ऑपरेशन कंपनी मार्यदित कंपनीचा देखील हातभार लागत आहे.

Mumbai Metro
मुंबई मेट्रो रेल्वे
author img

By

Published : Feb 8, 2023, 2:05 PM IST

मुंबई: ठाण्यातील पश्चिमेला असणारे वर्दळीचा परिसर कासार वडवली पासून घाटकोपर ते वडाळा असा मार्ग असणार आहे. त्यासोबत वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस मेट्रो मार्ग 11 चे काम मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडे देण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात ठाणे ते सीएसएमटी सरळ मेट्रो मार्ग प्रकल्प वेगाने पूर्ण होईल.

मेट्रो मार्ग वेगात : ठाणे शहरातील सुमारे 6 ते 7 लाख प्रवासी रोज लोकलने प्रवास करतात. मात्र ठाणे पश्चिम भागातील 7 किलोमीटरवर असलेल्या परिसरातून रेल्वे स्थानकावर येण्यासाठी वाहतुकीची कोंडी मोठी समस्या आहे. ते पार करून मगच मुंबईत पाय टाकता येतो. हीच बाब चार किंवा दुचाकी प्रवास करणाऱ्यांची देखील आहे. परंतु आता मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडे मेट्रो अकरा प्रकल्पाचे काम वर्ग केल्यामुळे लवकरात लवकर वडाळा ते सीएसएमटी मेट्रो मार्ग लवकर पूर्ण होईल. अशी आशा मुंबई आणि ठाण्याच्या नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

काम मेट्रो रेल्वे महामंडळाकडे : मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ यांच्याकडून मुंबईमधील तीन मार्ग कारभार सुरू आहे .यामध्ये आरे जंगलापासून ते विधान भवना पर्यंतचा प्रवास आहे. त्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. मेट्रो या भुयारी मार्गाने जमिनीच्या खाली भुयार खोदण्यासाठू अनेक अत्याधुनिक यंत्रणा वापरले आहे. विधानभवन पासून थेट मध्य रेल्वेला जोडणारे मेट्रो रेल्वे मार्गाचे वेगाने काम पाहूनच, आता मेट्रो प्रकल्प 11 चे सर्व काम मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडे वर्ग करण्यात आले आहे.

एमएमआरसिएलकडे कारभार: मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ 3 यांच्याकडून हा कारभार ठराविक वेळेत पूर्ण झाला. तर विरारकडून रस्त्याने येणारे प्रवासी कासारवडवली येथून थेट सीएसएमटीला जाऊ शकतात. तसेच ठाणे आजूबाजूला असणारे गावातील नागरिक देखील कासारवडवली पर्यंत येऊन, ठाणे रेल्वे स्थानकावर न जाता मेट्रोने छत्रपती शिवाजी टर्मिनस गाठू शकतात. राज्य शासनाकडून वाहतूक कोंडी रोखण्यासाठी विविध उपाय राबवले जातात. त्यात आता एमएमआरसिएलकडे कारभार देऊन मेट्रो मार्ग 11 जलदगतीने पूर्ण करण्याकडे शासनाचा कल होता. त्याबाबत शासनाने निर्णय घेऊन ठाण्यातील घोडबंदर ते गायमुख पासून सीएसएमटी पर्यंत मेट्रो धावण्याचे नियोजन केले आहे.

हेही वाचा: Mumbai Metro Service : मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी; पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान मेट्रोची सेवा 'या' वेळेत असणार बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.