ETV Bharat / state

आज.. आत्ता... शनिवारी सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर... - भारत

मेरठमध्ये किटकनाशकांच्या कंपनीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे ९ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत...आरक्षण द्यायचेच असेल तर सर्वांना आर्थिक निकषांवर द्यावे, अन्यथा सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली...भारताने अमेरिकेच्या २९ उत्पादनांवरील आयात शुल्क १६ जूनपासून वाढवणार आहेत...मुंबईत झाड कोसळून २ दिवसात ३ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मुंबई ही जीवाची आहे की मरणाची हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे....

आज.. आत्ता...
author img

By

Published : Jun 15, 2019, 9:06 AM IST

मेरठमध्ये किटकनाशकांच्या कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाचे ९ बंब घटनास्थळी दाखल

मेरठ - उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्याच्या मोहकमपूर औद्योगिक वसाहतीत आज पहाटे एक किटकनाशक उत्पादक कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगचे रूप एवढे रौद्र होते, की आजूबाजूच्या इतर कंपन्याही तिची झळ बसून त्यांनीही पेट घेतला. वाचा सविस्तर -

...अन्यथा सर्वांचेच आरक्षण काढून टाका - खासदार उदयनराजे

सोलापूर - आरक्षण या प्रश्नाचे राजकारण होत आहे. त्यातून जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे काम होते. यातून या देशातील लोकशाही धोक्यात येणार आहे. त्यामुळे आरक्षण द्यायचेच असेल तर सर्वांना आर्थिक निकषांवर द्यावे, अन्यथा सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापुरात केली. सिद्धयेश्वर मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच राजकीय स्वार्थांसाठी जातींचा आधार घेतला जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. वाचा सविस्तर -

मंत्रिमंडळाच्या विस्तारात आदित्य ठाकरेंना मिळणार उपमुख्यमंत्री पद ?

मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी वेगाने राजकीय हालचाली होत आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद येणार आहे. युवासनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र आदित्य हे तयार नसल्यास या पदासाठी एकनाथ शिंदे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. वाचा सविस्तर -

भारताचा अखेर पलटवार ; अमेरिकेच्या २९ उत्पादनांवरील आयात शुल्क १६ जूनपासून वाढविणार

नवी दिल्ली - अमेरिकेने भारतामधून आयात होणाऱ्या उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय सातत्याने लांबणीवर टाकला होता. अखेर भारतानेही अमेरिकेच्या २९ उत्पादनांवरील आयात शुल्क १६ जूनपासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक केंद्रीय वित्तमंत्रालयाने शुक्रवारी काढले आहे. वाचा सविस्तर -

जीवाची की मरणाची मुंबई ? झाड कोसळून २ दिवसात ३ जणांचा बळी

मुंबई - 'जीवाची मुंबई' असे राजधानीच्याबाबतीत म्हटले जाते. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर मरणाची मुंबई म्हणावी की असे चित्र निर्माण झाले आहे. झाड कोसळून गेल्या २ दिवसात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. अंधेरी येथे झाडाची फांदी अंगावर पडून अनिल घोसाळकर या नागरिकाचा मृत्यू झाला. वाचा सविस्तर -

बातमी, सर्वांच्या आधी...

Intro:Body:

Akshay - BULLETIN 9 AM

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.