ETV Bharat / state

शिक्षक दिनानिमीत्त राज्यातील 107 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

शिक्षक दिनानिमीत्त राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिका अशा १०७ शिक्षकांना पुरस्कृत करण्यात आले.

शिक्षकांचा गौरव
author img

By

Published : Sep 5, 2019, 9:32 PM IST

मुंबई - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती दिवस शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या दिनानिमीत्त राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिका अशा १०७ शिक्षकांना पुरस्कृत करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा सन २०१८-१९ चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईतील रंगशारदा हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्य शिक्षक पुरस्कारार्थींना एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

mumbai
शिक्षक दिनानिमीत्त राज्यभरातील १०७ शिक्षकांना पुरस्कृत करण्यात आले

सन २०१८-१९ च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर १०७ शिक्षकांची निवड केली. त्यामध्ये ३७ प्राथमिक शिक्षक, ३९ माध्यमिक शिक्षक, १८ आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक, ८ सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, २ विशेष शिक्षक (कला/क्रीडा ), १ अपंग शिक्षक/अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक व १ गाईड शिक्षक व १ स्काऊट शिक्षक यांचा समावेश आहे

यावेळी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार म्हणाले, येणाऱ्या काळातही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. शिक्षक दिनीच शिक्षकांचा सन्मान होणे ही बाब महत्वाची आहे. कारण शिक्षक विद्यार्थीच नाही तर देशाचे नागरिक घडविण्याचे काम करीत असतात. महाराष्ट्राला उज्ज्वल शिक्षण, उत्कृष्ट शिक्षक आणि शिक्षण सुधारकांची परंपरा आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. येणाऱ्या काळातही शिक्षक विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल ठरतील असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:राज्यातील 107 शिक्षकांचा शिक्षक दिनी झाला गौरव
mh-mum-01-teacher-medal-7201153

मुंबई, ता. ५ :

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिकांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे सन २०१८-१९ चे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईतील रंगशारदा हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार सरदार तारासिंह, आमदार कपिल पाटील, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव सौरभ विजय,शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. राज्य शिक्षक पुरस्कारार्थींना एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सन २०१८-१९ च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर १०७ शिक्षकांची निवड केलेली असून त्यामध्ये ३७ प्राथमिक शिक्षक, ३९ माध्यमिक शिक्षक, १८ आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक, ८ सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, २ विशेष शिक्षक (कला/क्रीडा ) व १ अपंग शिक्षक/अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक व १ गाईड शिक्षक व १ स्काऊट शिक्षक यांचा समावेश आहे
यावेळी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार म्हणाले, येणाऱ्या काळातही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. शिक्षक दिनीच शिक्षकांचा सन्मान होणे ही बाब महत्वाची आहे. कारण विद्यार्थीच नाही तर देशाचे नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात आणि यासाठी हे शिक्षक काम करीत असतात. महाराष्ट्राला उज्ज्वल शिक्षण, उत्कृष्ट शिक्षक आणि शिक्षण सुधारकांची परंपरा आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. येणाऱ्या काळातही शिक्षक विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल ठरतील असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.
Body:राज्यातील 107 शिक्षकांचा शिक्षक दिनी झाला गौरव
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.