ETV Bharat / state

Ghatkopar Fire Update : घाटकोपर आग; दोघांची प्रकृती गंभीर, ७ जणांना डिस्चार्ज - 1 died and 2 critical

घाटकोपर येथील पारेख हॉस्पिटलजवळ काल विश्वास इमारतीच्या मीटर बॉक्सला आग लागल्याची घटना घडली ( fire at a meter box in Ghatkopar ) होती. मात्र आगीत एकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. दरम्यान रूग्णालयात दाखल केलेल्या जखमींपैकी 2 जणांची प्रकृती गंभीर तर 7 जणांना डिस्चार्ज ( 2 critical and 7 people discharged in Ghatkopar Fire ) देण्यात आला आहे.

Ghatkopar Fire
घाटकोपर आग
author img

By

Published : Dec 18, 2022, 5:50 PM IST

मुंबई : घाटकोपर ( Ghatkopar Fire ) स्टेशन जवळ परख हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या विश्वास इमारतीमधील जुनोज पिझा हॉटेलच्या मीटर बॉक्सला काल दुपारी आग ( fire at a meter box in Ghatkopar ) लागली होती. या आगीमध्ये एकूण १४ जण जखमी झाले त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. दोघांची प्रकृती गंभीर असून एकाला ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तर सात जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

आगीत १४ जखमी : घाटकोपर येथील परख हॉस्पिटलला लागून असलेल्या विश्वास इमारतीमधील जुनोज पिझा हॉटेलच्या मीटर बॉक्सला काल दुपारी दोनच्या सुमारास आग ( meter box fire in Ghatkopar ) लागली. आगीमुळे परिसरात धूर पसरल्याने सुरक्षिततेच्या कारणामुळे परख हॉस्पिटलमधील २२ रुग्णांना इतर रुग्णालयात सुखरूप हलवण्यात आले. या आगीत एकूण १४ जण जखमी झाले. त्यापैकी कुरेशी देढीया या ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. १३ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तुकाराम घाग, शेर परिहार यांनी स्वताहून डिस्चार्ज घेतला आहे. तर कुलसुम शेख, सना खान, हितेश करानी, के. पी. सुनार, अनिल मडगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दोघांची प्रकृती गंभीर : या आगीमध्ये १८ ते २० टक्के भाजलेली तानिया कांबळे या १८ वर्षीय मुलीला राजवाडी रुग्णालयातून नवी मुंबई ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या मुलीची प्रकृती गंभीर आहे. तसेच आगीच्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने राजावाडी रुग्णालयाच्या एमआयसीयुमध्ये दाखल असलेल्या अधिश सहाटिया या १८ वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर आहे.

एकाचा मृत्यू : दरम्यान, या आगीत जखमी झालेल्या १४ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीमधून लोकांना बाहेर काढताना ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या आगीत कुरेशी देढीया या ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

घाटकोपर आग प्रकरण - घाटकोपर स्टेशनजवळ परख हॉस्पिटलच्या बाजूला विश्वास इमारत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर जुनोज पिझा हॉटेल आहे. या हॉटेलच्या मीटर बॉक्समध्ये काल दुपारी २ च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीच्या बाजूलाच लागून परख हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमधील रुग्णांना आगीचा आणि धुराचा धोका पोहचू नये यासाठी सुरक्षित रित्या २२ रुग्णांना परिसरातील इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले येतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.