ETV Bharat / state

गावठाणाची मोजणी आता ड्रोनद्वारे होणार; गावचे सर्व घटक डिजिटल नकाशावर - Sarpanch Balaji Mekle

ड्रोनद्वारे मोजनी केल्याने गावाचा पूर्ण नकाशा तयार होणार आहे. यामुळे विकासाचा आराखडा तयार होण्यास मदत होणार आहे. तसेच भविष्यातील भांडण-तंटे सोडविण्यासही मदत होईल. शिवाय अतिक्रमण झाल्यास आतिक्रमण निश्चिती करता येणार आहे.

कार्यक्रमाचे छायाचित्र
author img

By

Published : Jul 17, 2019, 9:46 AM IST

लातूर - जमाना डिजिटल युगाचा आहे. आता याचे लोन ग्रामीण भागातही वाढत आहे. शासन निर्णयानुसार आता जिल्ह्यातील गावठाण भूमापन प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, अंगणवाडी, सरकारी जागा, रस्ते व खासगी घरांच्या जागेची मोजणी आता ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ लातूर तालुक्यातील उमरगा बोरी येथे मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आला.

योजनेबद्दल माहिती देताना अधिकारी

ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार आता प्रत्येक गावातील गावठाणातील प्रत्येक घराच्या मोकळ्या भूखंडाची मोजणी ड्रोनद्वारे होणार आहे. प्रत्येक घराचा नकाशा तयार करून संबंधित मालकाला मालकी हक्काची सनद दिली जाणार आहे. यामुळे गावाचा पूर्ण नकाशा तयार होणार आहे. यामुळे विकासाचा आराखडा तयार होण्यास मदत होणार आहे. तसेच भविष्यातील भांडण-तंटे सोडविण्यासही मदत होईल. शिवाय अतिक्रमण झाल्यास आतिक्रमण निश्चिती करता येणार आहे.

नव्याने होणारा नकाशा जीपीएस सिस्टिमशी जोडला जाणार आहे. त्यामुळे गावाची थ्री.डी इमेज सॉफ्ट कॉपीमध्ये मिळणार आहेत. शिवाय अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीमही राबविता येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक घराचा ८ (अ) चा उतारा ऑनलाईन मिळणार असल्याची माहिती, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव यांनी दिली आहे.

या उद्धाटन कार्यक्रमाप्रसंगी भूमीअभिलेख विभागाच्या उपअधीक्षका सीमा देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, सरपंच बालाजी मेकले, सूर्यभान लांडगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Intro:गावठाणाची मोजणी आता ड्रोनद्वारे...गावचे सर्व घटक डिजिटल नकाशावर
लातूर : जमाना डिजिटल युगाचा आहे...आता याचे लोन ग्रामीण भागातही वाढत आहे. शासन निर्णयानुसार आता जिल्ह्यातील गावठाण भूमापन प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक गावातील शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, अंगणवाडी, सरकारी जागा, रस्ते व खाजगी घरांच्या जागांची मोजणी ड्रोन द्वारे करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ लातूर तालुक्यातील उमरगा बोरी येथे मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आला.
Body:ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार आता प्रत्येक गावातील गावठाणातील प्रत्येक घराची मोकळा भूखंडाची मोजणी ड्रोनद्वारे होणार आहे. प्रत्येक घराचा नकाशा तयार करून संबंधित मालकाला मालकी हक्काची सनद दिली जाणार आहे. गावचा पूर्ण नकाशा यामुळे तयार होणार आहे . त्यामुळे विकासाचा आराखडा तयार होण्यास मदत होणार आहे तसेच भविष्यातील भांडण-तंटे सोडविण्यास मदत होणार आहे. शिवाय अतिक्रमण झाल्यास आतिक्रमन निश्चिती करता येणार आहे. नव्याने होणार हा नकाशा जीपीएस सिस्टिमशी जोडला जाणार आहे. गावची थ्री डी इमेज सॉफ्ट कॉपी मध्ये मिळणार आहेत त्यामुळे अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम राबविण्यात येणार आहेत प्रत्येक घराचा ८ अ चा उतारा ऑनलाईन मिळणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुदाम जाधव यांनी दिली. Conclusion:या उपक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमास उपअधीक्षक भूमीअभिलेख सीमा देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील सरपंच बालाजी मेकले सूर्यभान लांडगे यांच्यासह ग्रामस्थ अधिकारी होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.