ETV Bharat / state

लातूर जिल्ह्यात सर्वत्र गावबंदी, निलंग्यात 8 कोरोनाग्रस्त आढळल्याने खबरदारी - कोरोना महाराष्ट्र अपडेट बातमी

२ एप्रिल रोजी एकाच दिवशी लातूर जिल्ह्यातील निलंग्यात कोरोनाचे ८ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून तर काळजी घेतली जात आहे. पण जिल्हा बंदीप्रमाणे गावकऱ्यांनी आता गावबंदी सुरू केली आहे.

villages-in-latur-district-lock-due-to-corona-virus
जिल्हातील गावात 'गावबंदी'
author img

By

Published : Apr 8, 2020, 11:04 AM IST

लातूर - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. त्या कार्यक्रमात सहभागी झालेले बाहेरील 12 नागरिक लातुरात आले. त्यातील 8 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे लातुरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील गावा-गावात खबरदारी म्हणून गावबंदी केली जात आहे.

जिल्हातील गावात 'गावबंदी'

हेही वाचा- न्यूयॉर्क शहरात मागील 24 तासामध्ये तब्बल 731 मृत्यू

२ एप्रिल रोजी एकाच दिवशी लातूर जिल्ह्यातील निलंग्यात कोरोनाचे ८ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून तर काळजी घेतली जात आहे. पण, जिल्हा बंदीप्रमाणे गावकऱ्यांनी आता गावबंदी सुरू केली आहे. परगावचा नागरिक गावात आला नाही पाहिजे आणि मूळचा गावातीलच पण पुणे- मुंबईहून आला असेल तर तपासणी करुनच त्याला गावात प्रवेश द्यायचा, असा ठरावच लातूर तालुक्यातील महाळंग्रा गावाने केला आहे. गावच्या प्रवेशद्वारावरच काठाड्या आणि दगडे ठेऊन विचारपूस करूनच ग्रामस्थांना गावात घेतले जात आहे.

लातूर शहरापासून महाळंग्रा गाव १२ किमीवर लातूर-अहमदपूर मार्गावर आहे. मुख्य रस्त्यालगतच गाव असल्याने फळ विक्रेते, फेरीवाले यांचा वावर कायम राहतो. शिवाय सध्या कोरोनाच्या धास्तीने पुणे-मुंबईहून येणाऱ्या नागिरीकांची संख्याही वाढली असून जिल्ह्यात कोरोनाचे ८ रुग्ण आहेत. त्यामुळे ३ एप्रिल रोजी ग्रामस्थांनी ठरावच घेतला की, गावातील नागरिकांशिवाय इतरांना गावात प्रवेश नाही. शहरातून परतणाऱ्या व्यक्तींनी जिल्हा रुग्णालयात तपासणी करुनच गावात प्रवेश करावा. असा नियमच या गावच्या नागरिकांनी लागू केला आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद तर होतेच. परंतु, प्रत्येक नागरिकावर लक्ष ठेवता येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

महाळंग्रा ग्रामस्थांनी लातूर जिल्ह्यात रुग्ण आढळताच ही खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. १४ एप्रिलपर्यंत अशीच गावबंदी राहणार असून भविष्यात लॉकडाऊन वाढले तर हा नियम कायम राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असले तरी यामध्ये मूळच्या लातूर जिल्ह्यातील एकाचाही समावेश नाही. कारण हे सर्व रुग्ण परराज्यातील आहेत. मात्र, असे असतानाही खबरदारी म्हणून ग्रामस्थ अशी भूमिका घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.