ETV Bharat / state

ऑनलाईन खरेदीच्या विरोधात निलंग्यात व्यापाऱ्यांचा 'बंद' - दुकान बंद आंदोलन

ऑनलाईन खरेदीच्या विरोधात निलंगा शहरात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन आंदोलन केले. शहरातील सर्व इलेक्ट्रिक वस्तू मोबाईल विक्रेते दुकानदारांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला.

Traders in nilanga city closed their shop
ऑनलाईन खरेदीच्या विरोधात निलंग्यात व्यापाऱ्यांचा बंद
author img

By

Published : Jan 8, 2020, 9:50 PM IST

लातूर - देशातील व परदेशातील कंपन्या आपला बनवलेला माल ऑनलाइन मार्केटिंगला विकतात. यामुळे स्थानिक व्यापार्‍यांवर अन्याय होत आहे, असा आरोप करत निलंगा येथील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. यावेळी शहरातील मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर व्यापाऱ्यांनी भारत बंदमध्ये सामील होत, एक दिवसाचा व्यापार बंद ठेवला. तसेच उपविभागीय अधिकारी निलंगा यांना निवेदन दिले.

ऑनलाईन खरेदीच्या विरोधात निलंग्यात व्यापाऱ्यांचा एक दिवसाचा बंद..

हेही वाचा...देशव्यापी संपात बँक कर्मचारी संघटनांचा सहभाग; बँकेच्या सेवा विस्कळीत

देशात सध्या काही भारतीय व परदेशी कंपन्या जास्तीत जास्त माल हा ऑनलाइन कंपनीला विक्री करून स्थानिक व्यापार्‍यांवर अन्याय करत आहेत. तसेच भारतीय फायनान्स कंपन्या या ऑनलाइन ग्राहकांना सवलती देतात. मात्र, स्थानिक व्यापारी ग्राहकांना वेगवेगळे चार्जेस लावून देत असल्याने सामान्य ग्राहक हा अधिकाधिक ऑनलाइन शॉपिंगकडे वळला जात आहे.

हेही वाचा... मलेशियाकडून पामतेल आयात थांबवा; सरकारची उद्योगांना सूचना

त्यामुळे स्थानिक व्यापारी अडचणीत येताना दिसत आहे. यासाठीच, काही दिवसात व्यापार बंद होत, बेकारीचा भडका उडेल. तसेच भारत सरकारने यात हस्तक्षेप करावा. स्थानिक व्यापाऱ्यांना सुविधा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन निलंगा येथील सर्व व्यापाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी विकास माने यांना दिले. यावेळी राजू कच्ची, खय्युम मासुलदार, दिलीप रंडाळे, श्रीशैल गबुरे, सबदरअली इनामदार, श्याम पांचाळ, संतोष भुरके आदींसह व्यापारी उपस्थित होते.

Intro:आॕन लाईन खरेदीच्या विरोधात व्यापा-चा दुकाने बंद ठेऊन आंदोलन Body:देशातील व परदेशातील कंपन्या या जास्तीत जास्त बनविलेला मालक नलाइन मार्केटिंग ला विकून स्थानिक व्यापार्‍यावर अन्याय करत आहेत यासाठी आज निलंगा येथील मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर व्यापाऱ्यांनी आज भारत बंद मध्ये सामील होऊन एक दिवस व्यापार बंद ठेवला व उपविभागीय अधिकारी निलंगा यांना निवेदन दिले

निलंगा/प्रतिनिधी

सध्या भारतीय व परदेशी कंपन्या जास्तीत जास्त माला हा ऑनलाइन कंपनीला विक्री करून स्थानिक व्यापार्‍यावर अन्याय करत आहेत तसेच भारतीय फायनान्स कंपन्या या ऑनलाइन ग्राहकांना सवलती देतात मात्र स्थानिक व्यापाऱ्यांच्या ग्राहकांना वेगवेगळे चार्जेस लावून देत असल्याने सामान्य ग्राहक हा ऑनलाइन शॉपिंग कडे कशाला जात आहे ्यामुळे स्थानिक व्यापार अडचणीत येऊन व्यापार्‍यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे काही दिवसात हा व्यापार बंद व बेकारीचा भडका उडेल त्यामुळे भारत सरकारने यात हस्तक्षेप करून परदेशी व भारतीय कंपन्या तसेच  फायनान्स कंपन्यांना ऑनलाइन सारखीच स्थानिक व्यापाऱ्यांना ही सुविधा देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन आज निलंगा येथील सर्व व्यापाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी विकास माने यांना दिले यावेळी राजू कच्ची, खय्युम मासुलदार, दिलीप रंडाळे, श्रीशैल गबुरे,सबदरअली इनामदार, श्याम पांचाळ संतोष भुरके, गोविंद इंगळे, जुबेर शेख, संदीप पांचाळ, स्वप्निल लाटे, वाजिद खादिम, असलम बागवान, दत्तात्रेय जाधव आदीसह व्यापारी उपस्थित होते.Conclusion:निलंगा शहरातील सर्व इलेक्ट्रिक वस्तू मोबाईल विक्रेत्या शेकडो दुकानदारानी बंद मध्ये सहभाग नोंदवला होता,
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.