लातूर - चाकूर येथील सराफा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सोने आणि चांदीवर हात साफ केला आहे. आठवडी बाजारा दिवशीच ही घटना घडली असून सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये घबहाराटीचे वातावरण आहे.
शहरातील यश ज्वेलर्सचे मालक भालके हे नेहमीप्रमाणे रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान दुकान बंद करून घराकडे परतले होते. सकाळी दुकानाचे शटर उचकटल्याचे त्यांना दिसले. तर दुकानातील 1 लाख 96 हजार 700 रुपयांची 3 किलो 25 ग्रॅम चांदी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. आठवड्याभरापूर्वीच शहरातील किराणा आणि औषध दुकानामध्ये चोरीच्या घटना झाल्या होत्या. सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे. ऐन रहदारीच्या ठिकाणीच अशा घटना वारंवार होत असल्याने सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर पोलीस हे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा सल्ला व्यापाऱ्यांना देत आहेत.
हेही वाचा - 'सरकारची कर्जमाफी म्हणजे, खोदा पहाड, निकला चुहा'