ETV Bharat / state

पालकमंत्री निलंगेकर भ्रष्ट; शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुखाचा आरोप - corrupt

राज्यात आगामी निवडणुकांसाठी नाही म्हणता म्हणता युती झाली. यामुळे जिल्ह्यात उत्साहचे वातावरण होते. मात्र, आता सिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांने थेट पालकमंत्र्यांच्या कामकाजावरच प्रश्न उपस्थित केल्याने जिल्ह्यात भाजप आणि सेनेत कटुता वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अभय साळुंके
author img

By

Published : Mar 2, 2019, 10:25 PM IST

लातुर - भाजप आणि शिवसेनेच्या युतीमुळे राज्यात आणि लातूर जिल्ह्यातही पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पालकमंत्री तथा कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी कामगारांसाठी वाटप करण्यात येत असलेल्या साहित्यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा केला असून त्यांच्यामुळे युतीची बदनामी होत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अभय साळुंके

गेल्या ५ दिवसांपासून जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांना बांधकाम साहित्य आणि ५ हजार रुपयांच्या निधी वाटपाचे कार्यक्रम मोठ्या दिमाखात घेतले जात आहेत. औसा, निलंगा, देवणी आणि शिरूर अनंतपाळ या तालुक्यामध्ये अद्यापर्यंत कामगार निधीचे वाटप झाले आहे. मात्र, या साहित्य वाटपात निलंगेकर यांनी हजारो कोटींचा घोटाळा केला आहे. कामगार कार्यालयात नोंद नसणाऱ्या भाजप कार्यकर्तांना या योजनेचा अधिक लाभ मिळवून दिल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत अभय साळुंके यांनी केला. कामगारांचा निधी भाजप कार्यकर्त्यांमध्येच कसा राहील, याचे नियोजन पालकमंत्री संभाजी पाटील यांनी स्वतः केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Intro:लातूरच्या भ्रष्ट पालकमंत्र्यामुळे युतीची बदनामी; शिवसेनेचा आरोप
लातुर : भाजप- सेनेच्या युतीमुळे राज्यात आणि लातुर जिल्ह्यातही पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, येथील पालकमंत्री तथा कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी कामगारांसाठी वाटप करण्यात येत असलेल्या साहित्यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा केला. यामुळे युतीची बदनामी होत असून त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी केले आहे.
Body:लातुर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांना बांधकाम साहित्य आणि 5 हजार रुपयांच्या निधी वाटपाचे कार्यक्रम मोठ्या दिमाखात घेतले जात आहेत. मात्र, या साहित्य वाटपात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी हजारो कोटींचा घोटाळा केला आहे. कारभारात पारदर्शकता या भाजपच्या धोरणालाच त्यांनी बगल दिली असून स्वतःच्या मतदार संघात पहिल्या टप्प्यात ह्या निधीचे वाटप केले आहे. शिवाय कामगार कार्यालयात नोंद नसणाऱ्या आणि भाजपचे कार्यकर्ते असणाऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळवून दिल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत अभय साळुंके यांनी केला. औसा, निलंगा, देवणी आणि शिरूर अनंतपाळ या तालुक्यामध्ये आद्यपर्यंत कामगार निधीचे वाटप झाले आहे. मात्र, कामगारांचा निधी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आणि पालकमंत्र्यकडेच कसा राहील याचे नियोजन पालकमंत्री संभाजी पाटील यांनी केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे युतीमुळे जिल्ह्यात उत्साहचे वातावरण आहे. परंतु पालकमंत्र्यांच्या या अर्थार्जनामुळे युतीची बदनामी होत असून कारवाईची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. Conclusion:त्यामुळे भाजप- सेनेची युती झाली असली तरी स्थानिक पातळीवरील मतभेद कायम असल्याचे दिसून येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.