ETV Bharat / state

पुलावरून वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वारास लोकांनी वाचवले; निलंगा - लातूर मार्गावरील घटना - वाहून जाणारा तरुण

एक तरुण आपल्या दुचाकीसह या पुलावरून पाणी वाहत असताना जात होता. लोकांनी त्यास नको जाऊ असे सागितले होते. मात्र, त्याने ऐकले नाही. गाडी पुलाच्या मध्यभागी आल्यावर पाण्याचा जोर जास्त झाला आणि तो तरुण गाडीसह वाहून जात होता. मात्र, प्रसंगावधान राखत आजूबाजूच्या तरुणांनी त्यास वाचवले.

nilanga
पुलावरून वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वारास लोकांनी वाचवले
author img

By

Published : Jun 30, 2020, 6:38 PM IST

Updated : Jun 30, 2020, 7:07 PM IST

लातूर - पावसाळ्यात कायमच छोट्या पुलावरून पाणी वाहत असते. बऱ्याच वेळा या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेकजण धोकादायक पुलावरून प्रवास करत असतात. काहीसा असाच प्रसंग लातूर जिल्ह्यातील निलंगा - लातूर मार्गावरील हाडगा गावाजवळच्या पुलावर घडला. एक तरुण आपल्या दुचाकीसह या पुलावरून पाणी वाहत असताना जात होता. लोकांनी त्यास नको जाऊ असे सागितले होते. मात्र, त्याने ऐकले नाही. गाडी पुलाच्या मध्यभागी आल्यावर पाण्याचा जोर जास्त झाला आणि तो तरुण गाडीसह वाहून जात होता. मात्र प्रसंगावधान राखत आजूबाजूच्या तरुणांनी त्यास वाचवले. ही सगळी घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पुलावरून वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वारास लोकांनी वाचवले

उमरगा हाडगा येथून निलंगा ते लातूर जाणारा हा जवळचा मार्ग म्हणून प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. परंतु, येथील वढ्यावरील पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी केली आहे. अनेकवेळा प्रशासनाला विनंती करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. हा पूल रुंद व उंच करण्यात यावा, अशी मागणी हाडगा येथील लोकांनी केली आहे.

Last Updated : Jun 30, 2020, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.