लातूर - प्लॅटफॉर्मवर बस लावताना मागच्या चाकाखाली वृद्ध प्रवासी चिरडला गेल्याची घटना घडली आहे. उदगीर बसस्थानकात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. वैजिनाथ कृष्णाजी सुरनर, असे चाकाखाली चिरडून ठार झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.
उदगीरहुन हाणेगावला जाणारी ( एमएच 20, बीएल - 2568 ) बस प्लॅटफॉर्मवर लावली जात होती. यावेळी मागच्या बाजूने वैजिनाथ कृष्णाजी सूरनर हे जात होते. मात्र, बसच्या मागचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवला असून शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे.
घटनेची नोंद शहर ठाण्यात करण्यात आली आहे. हवालदार सुधाकर केंद्रे पुढील तपास करीत आहेत.