ETV Bharat / state

भाजपच्या पहिल्याच बैठकीला खासदार सुनील गायकवाडांची दांडी - latur bjp

उमेदवारी मिळाली नसली तरी पक्षश्रेष्ठींचे आदेश पाळणार असल्याचे सांगणारे खासदार सुनील गायकवाड नेमके पहिल्याच बैठकीला गैरहजर असल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

खासदार सुनील गायकवाड आणि पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर
author img

By

Published : Mar 22, 2019, 6:10 PM IST

लातूर - पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुढील नियोजनासाठी शुक्रवारपासून भाजपच्या बैठका पार पडत आहेत. लातूरमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांच्या अनुपस्थितीची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. पुन्हा तिकिट न मिळाल्याने सुनील गायकवाड हे नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे.

संभाजी पाटील यांची प्रतिक्रिया

लातुरमधून खासदार सुनील गायकवाड आणि सुधाकर श्रृंगारे यांच्यापैकी उमेदवारी कुणाला मिळेल याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. गुरूवारी रात्री लातूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून जि. प. सदस्य सुधाकर श्रृंगारे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार कार्यकर्त्यांच्या बैठका आणि गाठी-भेटीवर जोर देण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठक घेऊन प्रचार यंत्रणा राबविण्याबाबत संभाजी पाटील आणि अभिमन्यू पवार यांनी त्यांना कानमंत्र दिला आहे. यावेळी सुनील गायकवाड यांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे गायकवाडांना डावलून प्रचार यंत्रणा राबवली जात आहे, की त्यांनीच या बैठकीला दांडी मारली, याची चर्चा रंगू लागली आहे.

उमेदवारी मिळाली नसली तरी पक्षश्रेष्ठींचे आदेश पाळणार असल्याचे सांगणारे खासदार सुनील गायकवाड नेमके पहिल्याच बैठकीला गैरहजर असल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. याबाबत गायकवाड यांना संपर्क साधला असता बाहेरगावी असून उशिरा बैठकीला येणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे नगरसेवक, जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली असून कमी काळात प्रचार यंत्रणा राबवायची कशी याबाबत चर्चा झाल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.

Intro:भाजपाच्या पहिल्याच बैठकीला खा.सुनील गायकवाड यांची दांडी
लातूर - पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आजपासून भाजपाच्या बैठका पार पडत आहेत. लातूर येथे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीत विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांच्या अनुउपस्थितीची चर्चा जोरदार रंगली होती. यावरून खा. सुनील गायकवाड हे नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Body:दरम्यान, खा. सुनील गायकवाड आणि सुधाकार श्रृंगारे यांच्यापैकी उमेदवारी कुणाला मिळते याची उत्सुकता शिघेला पोहचली होती. गुरूवारी रात्री लातूर लोकसभा मतदार संघासाठी भाजपाकडून जि.प.सदस्य सुधाकर श्रृंगारे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार कार्यकर्त्यांच्या बैठका आणि गाटी भेटीवर जोर देण्यात आला आहे. आज सकाळी शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठक घेऊन प्रचार यंत्रणा राबविण्याबाबत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांनी कानमंत्र दिला आहे. मात्र, यावेळी खा. सुनील गायकवाड यांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे खा. गायकवडांना डावलून प्रचार यंत्रणा राबवली जात आहे की नाराज सुनील गायकवाड यांनीच या बैठकीला दांडी मारली याची चर्चा रंगू लागली आहे. उमदवारी मिळाली नसली तरी पक्षश्रेष्ठींचे आदेश पाळणार असल्याचे सांगणारे खा. सुनील गायकवाड नेमकं पहिल्याच बैठकीला गैहजर कसे? याबाबत खा. गायकवाड यांच्या संपर्क साधला असता बाहेरगावी असून उशीरा बैठकीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. Conclusion:दुसरीकडे नगरसेवक, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली असून कमी काळात प्रचार यंत्रणा राबवायची कशी याबाबत चर्चा झाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.