ETV Bharat / state

BJP MLAs Suspension Quashes : महाविकास आघाडी सरकारला न्यायालयाने चपराक दिली : आमदार अभिमन्यू पवार

author img

By

Published : Jan 28, 2022, 7:44 PM IST

पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले ( 12 BJP Suspended MLA ) होते. या आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला ( BJP MLAs Suspension Quashes ) आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला ( MLA Abhimanyu Pawar Criticized MVA Government ) आहे.

आमदार अभिमन्यू पवार
आमदार अभिमन्यू पवार

लातूर : भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबनप्रकरणी ( 12 BJP Suspended MLA ) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत ( BJP MLAs Suspension Quashes ) करतो. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला न्यायालयाने न्यायालयाने दिलेली ही चपराक आहे, अशी प्रतिक्रिया लातूरच्या औसा विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली ( MLA Abhimanyu Pawar Criticized MVA Government ) आहे.

संख्याबळ कमी करण्याकरिता षडयंत्र

मागील पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडत असताना राज्य सरकारने भाजपाच्या 12 आमदारांना षडयंत्र करून सदस्यत्व रद्द करण्याचा काम केलं होतं. खरं पाहिलं तर आम्हा बारा आमदारांचे निलंबन व्हावं अशी कृती आमच्यापैकी कोणाकडूनही त्यावेळी झाली नव्हती. परंतु भारतीय जनता पार्टीचे संख्याबळ कमी करण्याकरिता हे षडयंत्र करण्यात आले. मात्र, आमचा न्यायालयावर विश्वास असल्याने आम्ही न्यायालयात दाद मागितली.

५० लाख जनतेचा न्यायालयाने सन्मान केला

महत्त्वपूर्ण असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने देत राज्य सरकारचा दावा फेटाळला असून, बारा आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. या निर्णयानुसार राज्यातील 50 लाख जनतेचा न्यायालयाने सन्मान करत न्याय दिला असून, आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या 50 लाख जनतेची माफी मागायला हवी, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी 'ई-टीव्ही भारत'शी दुरध्वनीवरुन बोलताना दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.