ETV Bharat / state

'अच्छा चलता हुं... दुवाओ में याद रखना' ! निरोप समारंभ प्रसंगी जी. श्रीकांत यांची लातूरकरांना भावनिक साद - लातूर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत निरोप समारंभ न्यूज

3 वर्षे 8 महिने एखाद्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावल्यानंतर सबंध किती जिव्हाळ्याचे बनतात याचा प्रत्यय लातूर येथे आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या निरोपसमारंभ कार्यक्रमात सर्व कर्मचारी- अधिकारी तर भावूक झालेच होते. शिवाय उपस्थित लातूरकर हे देखील यावेळी भावनिक झाले होते.

लातूर लेटेस्ट न्यूज
लातूर लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Dec 12, 2020, 12:53 PM IST

लातूर - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची अकोला येथे बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. गेल्या 3 वर्षे 8 महिन्यांपासून ते लातूर येथे कार्यरत होते. शुक्रवारी रात्री त्यांचा निरोपसमारंभ तर नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या स्वागतचा कार्यक्रम पार पडला. यावेळी 'अच्छा चलता हुं... दुवाओ में याद रखना' हे गीत जी. श्रीकांत यांनी गाताच भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

निरोप समारंभ प्रसंगी जी. श्रीकांत यांची लातूरकरांना भावनिक साद

हेही वाचा - सोलापूरात बेकायदा प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई; १८० किलो प्लास्टिक जप्त

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या बदलीच्या वावड्या उठत होत्या. पण आता ही कोणती अफवा नाही तर, अकोला येथे बदली झाल्याचे जी. श्रीकांत यांनीच स्पष्ट केले होते. 'शासकीय सेवेत बदली नैसर्गिक नियम आहे. पण लातूरकरांचे प्रेम, येथे राबविण्यात आलेले उपक्रम कायम स्मरणात राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जे जे नवे ते लातूरला हवे, अगदी त्याप्रमाणेच येथे कोणत्याही विकासाकामला कधी कुणाचा अडसर राहिला नाही. प्रशासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्याचा सुरवातीचा प्रयत्न अखेर सत्यात उतरला. म्हणूनच सर्वसामान्य जनता आणि प्रशासन यामध्ये सुसंवाद राहिला,' असे त्यांनी सांगितले. आठवणीत अशी एक गोष्ट सांगता येणार नाही तर, प्रत्येक दिवस स्मरणात राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद तर याच दरम्यान, आरोग्य तसेच पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक त्यांनी केले. 'क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात काम करीत असताना टीका झाली. पण जनतेला माहीत होते हिताचे निर्णय काय आहेत ते. त्यामुळे लातूर येथे काम करतानाचा प्रत्येक दिवस सोबत घेऊन निघालो आहे. भविष्यात काम करीत असताना पुन्हा कधी संधी मिळाली तर, लातूरकरांच्या सेवेत हजर राहीन', असा विश्वासही जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.

नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत तर, जी. श्रीकांत यांना निरोप

जी. श्रीकांत यांना निरोप देण्यासाठी तर नवे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या स्वागताचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानात पार पडला. महसूल विभागाच्या आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने लातूरकरांनी उपस्थिती लावली होती. एवढेच नाही तर जी.श्रीकांत यांच्या कार्याबद्दल अनेकांनी भावना व्यक्त केल्या. अखेर जी.श्रीकांत यांच्या 'अच्छा चलता हुं... दुवाओ में याद रखना' या गाण्याने सर्वांनाच भावनिक केले.

हेही वाचा - आयुष डॉक्टर याआधीही शस्त्रक्रिया करत होते मग आता विरोध का?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.