ETV Bharat / state

निवडणुकीत पराभव होऊनही 'त्याने' जिंकली मतदारांची मने; बॅनर लावून मानले आभार - लातूर बॅनर लावून मानले आभार

निवडणूक कोणतीही असो पराभव झाला तरी मोठ्या मनाने स्वीकारायला हवा. ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ 12 मते मिळाली असतानाही एका तरुणाने या मतदारांचे जाहीर आभार मानले आहेत. गावात जागोजागी आभाराचे फलक झळकीवले आहेत. त्यामुळे 1 मतावरून भांडण तंटे करणाऱ्यांसाठी या तरुणाने दाखवलेली ऋणाई खूप काही सांगून जाते.

latur election
बॅनर लावून मानले आभार
author img

By

Published : Jan 22, 2021, 8:43 AM IST

Updated : Jan 22, 2021, 8:49 AM IST

लातूर - जिल्ह्यात 408 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यापैकी काही बिनविरोध निघाल्या तर काही ठिकाणी सत्तापरिववर्तन झाले आहे. मात्र, यापेक्षा चर्चा अधिकची आहे, ती जळकोट तालुक्यातील कोनाळी डोंगर गाव या ग्रामपंचायतीची. येथील तरुण उमेदवार विकास शिंदे यास केवळ 12 मते मिळाली आहेत, असे असताना त्याने या 12 मतदारांचे आभार व्यक्त करणारे फलक गावात झळकावले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत एका-एका मताला महत्व असते. 10- 20 मतांनी पराभव झाला तरी उमेदवार हे मतदारांवर वेगळ्या पद्धतीने रोष व्यक्त करतात. वेळप्रसंगी हाणामारी देखील होते. पण जळकोट तालुक्यातील कोनाळी डोंगर गावच्या युवकाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विकास शिंदे याने यंदा प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक लढवली. यामध्ये त्याला 12 मतं मिळाली आहेत. असे असतानाही याचे कोणावर खापर न फोडता त्याच्या मनाचा मोठेपणा गावातील फलकामधून दिसत आहे.

बॅनर लावून मानले आभार
बॅनर लावून मानले आभार

विकासच्या बॅनरची सोशल मीडियावरून राज्यात चर्चा-

विकासला मतदान करणाऱ्या या मतदारांचे आभार मानण्यासाठी त्याने गावातील खंडोबा मंदिरावर एक बॅनर लावले आहे. यामध्ये ना जातीसाठी ना धर्मासाठी आमचा लढा मातीसाठी. ही 12 मते संघर्ष करण्यासाठीची ताकद आहे. या मतदारांचे उपकार आयुष्यभर विसरणार नसल्याचे त्याने सांगितले आहे. एकीकडे ग्रामपंचायत निवडणुका या प्रतिष्ठेच्या बनत आहेत. तर दुसरीकडे राजकारणात पदार्पण केलेल्या विकासाने असा आदर्श घडवून आणला आहे. विकास शिंदे यांनी लावलेल्या बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या बॅनरची चर्चा केवळ लातूर जिल्ह्यातच नव्हे सबंध महाराष्ट्रात होत आहे.

'त्याने' जिंकली मतदारांची मने;

काय आहे बॅनरवर मजकूर
आम्ही जातो आमच्या गावा... आमचा राम-राम घ्यावा. आमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 12 मतदारांचे जाहीर आभार. ना जातीसाठी ना धर्मासाठी आमचा लढा केवळ मातीसाठी. मला ज्यांनी मते देऊन संघर्ष करण्याची ताकद दिली, त्यांचे उपकार सात जन्म विसरणार नसल्याचे विकास शिंदे याने म्हटले आहे. एवढेच नाही तर खंडोबा नगरीतून पराभूत उमेदवार म्हणून स्वतःच्या नावाचाही उल्लेखही त्याने या बॅनरवर केला आहे.

Last Updated : Jan 22, 2021, 8:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.