ETV Bharat / state

कोट्यवधींचा शेतमाल घेऊन व्यापारी फरार; लातुरात आडत्यांचे आमरण उपोषण

आडत व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींचा शेतमाल घेऊन व्यापारी फरार झाला आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 13 आडत्यांची लाखोंची फसवणूक झाली आहे.

कोट्यवधींचा शेतमाल घेऊन व्यापारी फरार; लातुरात आडत्यांचे आमरण उपोषण
author img

By

Published : May 21, 2019, 1:46 PM IST

लातूर - आडत व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींचा शेतमाल घेऊन व्यापारी फरार झाला आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 13 आडत्यांची लाखोंची फसवणूक झाली आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन योग्य कारवाई करीत नसल्याने सोमवारपासून आडत्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

कोट्यवधींचा शेतमाल घेऊन व्यापारी फरार; लातुरात आडत्यांचे आमरण उपोषण

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाखोंची उलाढाल होते. दरम्यान, 5 महिन्यापुर्वी काही खरेदीदार व्यापाऱ्यांनी आडत्यांकडून शेती माल घेतला. मात्र, त्याचा मोबदला आडत्यांना दिला नाही. त्यामुळे ८ दिवस येथील बाजार समिती बंद होती. 5 महिन्यात 2 व्यापाऱ्यांनी पैसे अदा केले असले तरी गोवर्धन नरसिंगदास पल्लोड यांच्याकडे १३ व्यापाऱ्यांची थकीत रक्कम कायम होती. या आडत्यांनी शेतकऱ्यांचे पैसे पदरूहून दिले असल्यामुळे हे आडती अडचणीत आले आहेत. तसेच खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना उचल देणे अशक्य होत आहे.

यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीही ठोस कारवाई करत नसल्याने आडत व्यापाऱ्यांचे 3 कोटी रुपये अडकले आहेत. ही रक्कम त्वरीत अदा करावी, या मागणीसाठी आडत्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शेतकरी संघटनेने पाठींबा दिला असून राजकुमार सस्तापूरे हे उपस्थित होते. यावेळी आडत व्यापारी असोसिएशनचे अजिंक्य सोनवणे, आनंद मालू, अ‍ॅड. मंगेश कोरे, दिनकर मोरे, रमेश सुर्यवंशी, गोविंद गोलावार, सदाशिव एरंडे, संजय पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी एका व्यापाऱ्याची थोडीफार रक्कम शिल्लक राहिली असून काही दिवसांमध्ये ती रक्कमही अदा केली जाणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नंदकिशोर गायकवाड यांनी सांगितले.

Intro:कोट्यावधीच्या थकबाकीपोटी लातूरात आडत्यांचे आमरण उपोषण
लातूर - आडत व्यापाऱ्यांकडून कोट्यावधीचा शेतीमाल घेऊन खरेदी व्यापारी हा फरार आहे. त्यामुळे कृ.ऊ.बा मधील १३ आडत्यांची लाखोंची फसवणूक झाली आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासनही योग्य कारवाई करीत नसल्याने सोमवारपासून कृ.ऊ.बा.मध्ये आडत्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे ५ महिन्यांपासून रखडेला प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आडत्यांनी केली आहे.
Body:लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाखोंची उलाढाल होते. दरम्यान, पाच महिन्यापुर्वी काही खरेदीदार व्यापाऱ्यांनी आडत्यांकडून शेती माल घेतला मात्र त्याचा मोबदला आडत्यांना दिलाच नाही. त्यामुळे ८ दिवस येथील बाजार समिती बंद होती. पाच महिन्यात दोन व्यापाऱ्यांनी पैसे अदा केले असले तरी गोवर्धन नरसिंगदास पल्लोड यांच्याकडे १३ व्यापाऱ्यांची थकीत रक्कम कायम होती. या आडत्यांनी शेतकऱ्यांचे पैसे पदरून दिले असले तरी हे आडती अडचणीत आहेत. शिवाय खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना उचल देणे अशक्य होत आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीही ठोस कारवाई करीत नसल्याने आडत व्यापाऱ्यांचे लाखो रुपये अडकले आहेत. ही रक्कम त्वरीत अदा करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला शेतकरी संघटनेने पाठींबा दिला असून जिल्हा राजकुमार सस्तापूरे हे उपस्थित होते. शिवाय आडत व्यापारी असोसिएशनचे अजिंक्य सोनवणे, आनंद मालू, अ‍ॅड. मंगेश कोरे, दिनकर मोरे, रमेश सुर्यवंशी, गोविंद गोलावार, सादाशिव एरंडे, संजय पाटील यांची उपस्थिती होती. खरेदीदार व्यापाऱ्यांकडून निम्म्याहून अधिकची रक्कम आडत्यांना देण्यात आली आहे. Conclusion:एकाच व्यापाऱ्याची थोडीफार रक्कम शिल्लक राहिली असून काही दिवसांमध्ये ती रक्कमही अदा केली जाणार असल्याचे कृ.ऊ.बा. चे सचिव नंदकिशोर गायकवाड यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.