लातूर - गेल्या तीन महिन्यांपासून देशभर सीएए, एनआरसीविरोधात जनता रस्त्यावर उतरत आहे. उदगीरमध्ये तर सर्व वकिलांनी रस्त्यावर उतरत या कायद्याला विरोध केला आहे. विधीज्ञ कृती समितीनेच रॅली काढून या कायद्यविरोधात घोषणाबाजी केली. शिवाय चाकूरमध्येही महिलांनी मोर्चा काढला होता.
संविधानाने घालून दिलेली तत्वे मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याची भावना या कायद्यांमुळे होत आहे. त्याला विरोध करत आता विविध प्रकारची आंदोलनं झाली आहेत. एनआरसी व एनपीआर कायद्याविरोधात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने ही रॅली मार्गस्थ होत तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हा अन्यायकारक कायदा जनतेवर लादू नये, यामुळे जातीय तेढ निर्माण होत असून राष्ट्रपती यांनी हा कायदा रद्द करून देशहिताचा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्यामुळे सर्वसामान्य जनताच नाही तर आता कायद्याचे धडे देणारे वकीलही हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.
हेही वाचा - 'अत्याचार करण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून संपवून टाका'
'कोणी शिक्षक देता का शिक्षक' असे म्हणत चिमुकल्यांचा पंचायत समितीवर मोर्चा