ETV Bharat / state

जिल्हा मध्यवर्ती बँक दरोडा प्रकरणी दोघांना अटक; ऑक्सिजन सिलींडरवरून काढला माग - शिरोळ

संशयित आरोपींकडून १२ लाख रुपये किमतीची आलिशान कार पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपींना न्यायालयाने ७ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे

दरोडा प्रकरणात आंतरराज्य टोळीतील दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
author img

By

Published : Mar 22, 2019, 1:19 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यातील शिरोळ येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा घालून सुमारे २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. या प्रकरणात आंतरराज्य टोळीतील दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. चंद्रसिंग उर्फ लाला नरसिंग खुर्दे (बुलडाणा) आणि संतोष हरी कदम (सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख.

संशयित आरोपींकडून १२ लाख रुपये किमतीची आलिशान कार पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपींना न्यायालयाने ७ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने कर्नाटक राज्यातील बदामी येथील बँक लुटून सोने व रोख रक्कम अशी साडेचार कोटींची रक्कम लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.

जिल्हा बँकेच्या शिरोळ शाखेत डिसेंबर २०१८ मध्ये अज्ञात चोरट्यांनी बँकेत प्रवेश करून सभासदांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांच्या तिजोरीचा दरवाजा तोडून त्यातील सुमारे २५ लाख ५६ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात गगनबावडा तालुक्यातील कळे येथील यशवंत बँकमध्ये अशाच प्रकारचा दरोडा टाकून ७२ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या दरोड्याच्या तपासा दरम्यान दोघांना अटक केली होती.

शिरोळ येथील बँक चोरी प्रकरणात गॅसचा वापर झालेल्या ऑक्सिजन सिलींडरमध्ये साम्य असल्याने सदरची सिलींडर ही कोणत्या एजन्सीची आहेत याबाबत पोलिसांनी माहिती घेतली. तेव्हा ही सिलिंडर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील सागर गॅस एजन्सीकडील असल्याची माहिती प्राप्त झाली. हाच संशयाचा धागा पकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे आणि सहकाऱ्यांनी बुलडाणा येथे जावून आरोपी चंद्रसिंग उर्फ लाला खुर्देला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता शिरोळ येथील बँक चोरीच्या गुन्ह्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Intro:अँकर- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ इथल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा घालून सुमारे २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना जेरबंद करण्यात पोलिसाना यश आले आहे. बुलढण्याचा चंद्रसिंग उर्फ लाला नरसिंग खुर्दे आणि सोलापूरचा संतोष हरी कदम अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून १२ लाख रुपये किमतीची आलिशान कार पोलिसांनी जप्त केली आहे. अटक आरोपींना न्यायालयाने ७ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने कर्नाटक राज्यातील बदामी येथील बँक लुटून सोने व रोख रक्कम अशी साडेचार कोटींची रक्कम लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.Body:व्हीओ-1- जिल्हा बँकेच्या शिरोळ शाखेत डिसेंबर २०१८ मध्ये अज्ञात चोरट्यांनी बँकेत प्रवेश करून सभासदांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची तिजोरीचा दरवाजा तोडून त्यातील सुमारे २५ लाख ५६ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात गगनबावडा तालुक्यातील कळे इथल्या यशवंत बँकमध्ये अशाच प्रकारचा दरोडा टाकून ७२ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या दरोड्याच्या तपासा दरम्यान दोघांना अटक केली होती. शिरोळ इथल्या बँक चोरी प्रकरणात गॅसचा वापर झालेल्या ऑक्सिजन सिलिंडर मध्ये साम्यता असलेने सदरची ऑक्सिजन सिलिंडर ही कोणत्या एजन्सीची आहेत याबाबत माहिती घेतली असता सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी इथल्या सागर गॅस एजन्सी कडील सिलिंडर असलेची माहिती प्राप्त झाली. हाच संशयाचा धागा पकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे आणि सहकाऱ्यांनी बुलढाणा येथे जावून आरोपी चंद्रसिंग उर्फ लाला खुर्देला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता शिरोळ येथील बँक चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बाईट- अभिनव देशमुख (पोलीस अधीक्षक, कोल्हापूर)Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.