कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही लोक तोंडाला मास्क लावत आहेत. तर अनेक ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करण्यात येतोय. पन्हाळ्यातील वाघवे गावात ट्रॅफिक पोलीस बाजीराव कापसे हे देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घेत आहेत. यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढलीय.
कामावरून परतल्यावर ते थेट सॅनिटायझर शॉवर घेऊन घरात प्रवेश करत आहेत. सद्या अनेक ठिकाणी सॅनिटायझरचे चेंबर बसवल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. पण शेतामध्ये औषध फवारणीसाठी वापरत असलेल्या पंपाचा वापर करत त्यांनी घरगुती सॅनिटायझरचे चेंबर बनवले आहे.
ट्रॅफिक पोलीस बाजीराव कापसे यांनी औषध फवारणी पंपाचा वापर करत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेतल्याचे उत्तम उदाहरण सर्वांना दाखवून दिलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.