कोल्हापूर- भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलून स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देणे हा पटेल यांचा अपमान आहे. थोर स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान असून या गोष्टीचा मी निषेध करतो. याचा परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नक्कीच होईल, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. इंधन दरवाढ वरून मुश्रीफ म्हणाले, केंद्र सरकार एकदा निवडणूका झाल्या की चार वर्षात सर्व वस्तूंचे दर वाढवते. या तीन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर आकाशाला भिडले आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली असून मोदींनी शतक ठोकले आहे असा टोलाही त्यांनी लगावला. तर घरगुती गॅसच्या किंमती वाढवल्या आहेत. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. चार वर्ष दर वाढवायचे आणि निवडणूक आली की दर कमी करायचे आणि निवडणुका जिंकायचे यावरून नागरिक बेजार झाला आहे. या षडयंत्राला सर्वसामान्य नागरिक आता ओळखल्याशिवाय राहणार नाही. तसेच भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे मुश्रीफ म्हणाले.
हा तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान-हसन मुश्रीफ - narendra modi stedium news
चार वर्ष दर वाढवायचे आणि निवडणूक आली की दर कमी करायचे आणि निवडणुका जिंकायचे यावरून नागरिक बेजार झाला आहे. या षडयंत्राला सर्वसामान्य नागरिक आता ओळखल्याशिवाय राहणार नाही. तसेच भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे मुश्रीफ म्हणाले.