कोल्हापूर - महापालिकेच्या मुख्य इमारतीशेजारील मोबाईलच्या दुकानात बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये ३ लाख ८० हजार रुपायांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. शहरातील भाऊसिंग रोडवर योगीराज मोबाईल दुकान आहे. रात्री दीड वाजता चोरट्याने खिडकीतून दुकानात प्रवेश केला. त्यांनी ३ लाख रुपयांचे मोबाईल हँडसेट आणि ८० हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केले आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीने चोरट्याचा शोध घेत आहेत.