ETV Bharat / state

Farmer Electricity Bill : एक लाखांहून अधिक आलेलं वीजबिल दुरुस्तीनंतर केवळ 2 हजार; कागल तालुक्यातील धक्कादायक प्रकार - Latest News of Kolhapur

कागल तालुक्यातील एका शेतकऱ्याला शेतीपंपाचे वीजबिल ( Agricultural pump electricity bill ) एक लाखांहून अधिक आलेले, तेच वीजबिल दुरुस्तीनंतर केवळ 2 हजार इतके आले आहे. हा प्रकार कागल तालुक्यातील व्हन्नूर गावातील सागर संकपाळ या शेतकऱ्याच्या बाबतीत घडला आहे.

Bill
Bill
author img

By

Published : Mar 17, 2022, 2:32 PM IST

कोल्हापूर : कागल तालुक्यातील प्रकार एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. एका शेतकऱ्याला तब्बल 1 लाख 9 हजार 750 रुपये इतके आलेले वीजबिल दुरुस्तीनंतर केवळ 2 हजारवर आल्याचा प्रकार समोर आला आहे. कागल तालुक्यातल्या व्हन्नूर गावात हा प्रकार घडला असून सागर संकपाळ ( Farmer Sagar Sankapal electricity bill ) असे संबंधित शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ( Swabhimani Shetkari Sanghatana ) वाढवून आलेले विजबिल दुरुस्त करून मिळावे, तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर वीजबिल दुरुस्त करण्याचे आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शेट्टी यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांची वाढवून आलेली बिले मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

एक लाखांहून अधिक आलेलं वीजबिल दुरुस्तीनंतर केवळ 2 हजार

वीजबिल दुरुस्ती शिबीर सुरू -

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नासाठी महावितरण समोर केलेल्या ठिय्या आंदोलनाची सरकारने दखल घेऊन वीज बिल दुरुस्तीसाठी शिबीर घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार कागल तालुक्यातील शेतीपंपाच्या वीज ग्राहकांच्या शिबीरामध्ये ( Power Consumer Camp ) शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपली बिले दुरुस्त करून घेतली. यामध्ये सागर संकपाळ या शेतकऱ्याचला आलेले वीजबिल 1 लाख 9 हजार 750 रूपयेचे होते, ते वीजबिल दुरुस्त होऊन ते केवळ 2000 रूपये इतके झाले. या शेतकऱ्यांनी या बिलाची रक्कम तत्काळ भरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आभार मानले आहे.

सर्व शेतकऱ्यांनी आपली बिले दुरुस्त करून घ्यावीत -

सर्व शेतकऱ्यांनी शिबिराच्या माध्यमातून आपली बिले दुरुस्त करून घ्यावीत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आवाहन ( Swabhimani Shetkari Sanghatana Appeal ) करण्यात आले आहे. शिवाय काहीही अडचण आल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे देखील सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.