ETV Bharat / state

कागल तालुक्यात दहा दिवस जनता कर्फ्यू; हसन मुश्रीफांची माहिती

कोल्हापूरच्या कागल तालुक्यात 10 दिवस जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. 6 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरपर्यंत कागल तालुका पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत माहिती दिली.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
author img

By

Published : Sep 4, 2020, 9:18 PM IST

कोल्हापूर - एकीकडे देशभरात 'अनलॉक'ची प्रक्रिया राबवली जात असताना कोल्हापूरच्या कागल तालुक्यात मात्र पुढचे 10 दिवस जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. 6 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरपर्यंत कागल तालुका पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत माहिती दिली.

कोल्हापूर

लॉकडाऊन दरम्यान औषधांची दुकाने, दूध, कृषी केंद्रे सुरू राहणार आहेत. शिवाय खासगी आणि शासकीय नोकरदार आपले ओळखपत्र दाखवून नोकरीसाठी बाहेर पडू शकणार आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत 748 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर 10 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातून अनेकजण लॉकडाऊन करण्याबाबत सूचना करत होते. त्यानुसार आज कागलमधील सर्वच पदाधिकाऱ्यांच्यासोबत बैठक घेऊन हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - कंगनाला रणौतला आरपीआय देईल संरक्षण.. रामदास आठवले आले मदतीला

या दहा दिवसात कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. प्रसंगी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना 'पोलिसी खाक्या' दाखविण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, जिल्ह्यात आत्तापर्यंत 26 हजार 344 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 16 हजार 783 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शिवाय आजपर्यंत 804 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात 8 हजार 757 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.