कोल्हापूर - शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. मागील बारा दिवसांपासून सुरु असणाऱ्या या आंदोलनाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सर्व विधी पार पाडत सरकारचे 12 वे घालत, मुंडण आंदोलन केले आहे. तसेच, गोडाचा नैवैद्य तयार करुन सरकार विरोध घोषणाबाजी केली ( Swabhimani Shetkari Sanghatana Agitation Kolhapur ) आहे.
याबाबात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, लोकांमध्ये थोडी जरी अस्वस्थता जाणवली तर त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यावर उपाययोजन करणे सरकारचे काम आहे. मात्र, गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे लक्ष नसल्याने सरकार असंवेदनशील झाले आहे. सरकार शेतकऱ्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. सरकारची कोणतीच संवेदना दिसत नसल्याने आज बारावे घालण्यात आले आहे. आता तरी सरकारच्या आत्मास शांती मिळेल, असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला आहे.
काय आहे मागणी?
कोरोनानंतर राज्यातील शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे. त्यातच सरकारकडून वेगवेगळे नियम लावून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. तसेच, सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळत नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी मिळणारी जी वीज आहे. त्या पाण्याद्वारेच शेतीला पाणी द्यावे लागते. रात्रीच्या वेळी पाणी देत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असतात, त्यामुळे महावितरणमधून देण्यात येणारी वीज ही शेतकऱ्यांनी दिवसाही देण्याची मागणी करत स्वाभिमानीने कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर सरकारविरोधात आंदोलन सुरु केले आहे.
हेही वाचा - Atul Londhe On Phone Tapping Case : रश्मी शुक्लांना आदेश देणाऱ्या 'बिग बॉस’चा शोध घ्यावा - अतुल लोंढे