कोल्हापूर- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या हळूहळू वाढत असतानाच जिल्ह्यात केवळ दोन दिवस पुरेल इतकाच कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा शिल्लक आहे. बुधवारी सांगली जिल्ह्यातून पाच हजार डोस मागवण्यात आले आहेत. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणाला पुढे यावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. आरती मोकळे यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे. बुधवारी 46 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून त्याची संख्या आता 337 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 51 हजार 152 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 1752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत एकूण 49 हजार पेक्षा जास्त रुग्णांना उपचार घेऊन घरी सोडण्यात आले आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 337 रुग्ण उपचार घेत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा - कोरोना लसीचा तुटवडा
जिल्ह्यात केवळ दोन दिवस पुरेल इतकाच कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीचा साठा शिल्लक आहे. बुधवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यातून 5000 डोस मागवण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुरुवातीपासून कोव्हीशिल्ड लसीचे डोस देण्यात येत आहेत.