ETV Bharat / state

Vishalgad Encroachment : अन् विशाळगडावरील अतिक्रमण हटवायला सुरुवात! - Removal of Vishalgad encroachment

माजी खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी स्वतः विशाळगडावर जाऊन तेथे झालेले अतिक्रमण तसेच तिथल्या परिस्थितीबाबत माहिती घेतली होती. (Vishalgad Encroachment). विशाळगडाला घाणीतून मुक्त करणार आहात की नाही? तुम्ही करणार नसाल तर मग मला यामध्ये उतरावे लागेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 8, 2022, 8:42 PM IST

कोल्हापूर : विशाळगडावर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. (Vishalgad Encroachment). त्यावरून माजी खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी दोन दिवसांपूर्वी तिथे जाऊन स्वतः पाहणी केली होती. त्यांनी याकडे राज्यकर्ते आणि विरोधी गटाच्या नेत्यांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्यानंतर याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. प्रशासनाने महाशिवरात्री पर्यंत अतिक्रमण काढण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार आता अतिक्रमण काढायला सुरुवात करण्यात आली आहे. आज विशाळगडाच्या पायथ्याला झालेले अतिक्रमण काढण्यात आले. (Removal of Vishalgad encroachment).

संभाजीराजे यांनी केली होती पाहणी : माजी खासदार संभाजीराजे यांनी स्वतः विशाळगडावर जाऊन तेथे झालेले अतिक्रमण तसेच तिथल्या परिस्थितीबाबत माहिती घेतली होती. विशाळगडाला घाणीतून मुक्त करणार आहात की नाही? तुम्ही करणार नसाल तर मग मला यामध्ये उतरावे लागेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता.

माजी खासदार संभाजीराजे

गेल्या अनेक वर्षांपासून विशाळगड संवर्धन तसेच इथला अतिक्रमणाचा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे शिवप्रेमींसह हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्याने सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.