कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजू शेट्टी यांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरातील महावितरण कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू ( Swabhimani Shetkari Sanghatana Protest Kolhapur ) आहे. मात्र आज आंदोलनाला हिंसक वळण लागले. पहाटेच्या सुमारास काही अज्ञात कार्यकर्त्यांनी कागल येथील महावितरण कार्यालय ( MSEDCL Office Lit ) पेटवले. छत्रपती शाहू साखर कारखान्याची अग्निशमन गाडी आणून आग आटोक्यात आणण्यात आली. राज्यात सुद्धा आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता होती. त्याच पार्श्वभूमीवर शेट्टींनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले ( Raju Shetti Appeal ) आहे.
दोन दिवसांपासून आंदोलन सुरू
दरम्यान, शेतीला दिवसा 10 तास विनाकपात वीज द्या, शेतीपंपाच्या वीज बिलांची तत्काळ दुरूस्ती करावी, शेतीपंपाची कनेक्शन तोडणे त्वरीत थांबवावे, अन्यायी वीज बील वसुली थांबवावी आदी मागण्या साठी गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूरातील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. स्वतः राजू शेट्टी याठिकाणी आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र जिल्ह्यातल्या संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक होत कागल येथील कार्यालयाला आग लावली. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले.
सत्याग्रहाच्या माध्यमातून लढाई जिंकू
दरम्यान, शेतकऱ्यांना आवाहन करताना शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी संयम राखणे गरजेचे आहे. हिंसक वळण लागले तर आंदोलनाची धार कमी होऊन हे मोडले जावे अशीच राज्यकर्त्यांची ईच्छा असते त्यामुळे असे करू नका. आपण सत्याग्रहाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करायला भाग पाडू. केंद्र सरकारला सुद्धा आपण शेतकऱ्यांनी संयमाने आंदोलन करून तीन काळे कृषी कायदे मागे घ्यायला भाग पाडले आहे. गांधीजींनी सुद्धा सत्याग्रहाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्यामुळे संयम सोडू नका आपण आपल्या मागण्या याच पद्धतीने मांडू आणि त्या मान्य करायला भाग पाडू असेही शेट्टींनी म्हंटले. दरम्यान, सरकारला सुद्धा त्यांनी या माध्यमातून इशारा देताना म्हणाले, ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. एकदा हे हाताबाहेर गेले तर तुम्हाला रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाहीत. त्यामुळे तात्काळ मागण्या मान्य करा पुढे अनेक निवडणुकांना सुद्धा सामोरे जायचे आहे त्यावेळी तुम्हाला हे सर्वजण तुमची जागा दाखवतील असेही शेट्टींनी म्हटले.