ETV Bharat / state

Prakash Ambedkar criticism on BJP : भाजप मुस्लिम समाजाला उमेदवारी देत नाही - प्रकाश आंबेडकर - Prakash Ambedkar

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ओबीसी नेते प्रचारासाठी येतील तेव्हा आपण ओबीसी आरक्षणासंदर्भात काय केले हा प्रश्न विचारा, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी म्हटले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये ( By Election North Kolhapur ) वंचितचे उमेदवार शाहिद शेख यांच्या प्रचारासाठी ते शनिवारी (दि. 4 एप्रिल) कोल्हापुरात आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधत भाजप निवडणुकीत मुस्लिम समाजाला उमेदवारी देत नाही. त्यामुळे मुस्लिम समाज त्यांना मते देत नाही, अशी परिस्थिती असल्याचेही ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Apr 4, 2022, 5:13 PM IST

Updated : Apr 4, 2022, 5:42 PM IST

कोल्हापूर - काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ओबीसी नेते प्रचारासाठी येतील तेव्हा आपण ओबीसी आरक्षणासंदर्भात काय केले हा प्रश्न विचारा, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी म्हटले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये ( By Election North Kolhapur ) वंचितचे उमेदवार शाहिद शेख यांच्या प्रचारासाठी ते शनिवारी (दि. 4 एप्रिल) कोल्हापुरात आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधत भाजप निवडणुकीत मुस्लिम समाजाला उमेदवारी देत नाही. त्यामुळे मुस्लिम समाज त्यांना मते देत नाही, अशी परिस्थिती असल्याचेही ते म्हणाले.

बोलताना प्रकाश आंबेडकर

हे प्रश्न मुस्लिम समाजासाठी महत्वाचे प्रश्न - यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, दोन दिवसांपूर्वी काही संघटनांकडून मशिदीतून लाऊड स्पीकरवरुन जी आजान दिली जाते ती बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शिवाय दबक्या आवाजात असेही संगीतले जात आहे की नमाज सार्वजनिक ठिकाणापेक्षा घरामध्ये अदा केली जावी. दुसरे म्हणजे कर्नाटकात हिजाब संदर्भात दिलेला निर्णय. हे प्रश्न मुस्लिम समाजाच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न आहेत. शिवाय भाजप आत्ताच्या आणि येणाऱ्या निवडणुकीत मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली नाही व देणार नाही. त्यामुळे मुस्लिम समाज त्यांना मते देत नाही, अशी परिस्थिती असल्याचेही ते म्हणाले. यावेळी ते वंचित बहुजन आघाडी भाजपची 'बी' टीम नाही, असेही म्हणाले.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर काँग्रेसची दयनीय अवस्था - ते पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशमधील निवडणुकीनंतर काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. मतदारच उरला नाही, असे चित्र उभा राहीले आहे. वंचित बहुजन आघाडीने मागच्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये जी आपली ताकद दाखवली आहे ती आजही टिकून आहे. त्यामुळे आजही आम्ही मुस्लिम धर्मगुरूंशी चर्चा केली.

हेही वाचा - Chandrakant Patil Warns Voters : कोल्हापुरातील मतदारांची ईडी चौकशी होणार.. चंद्रकांत पाटलांचा इशारा

Last Updated : Apr 4, 2022, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.