ETV Bharat / state

Omicron In Kolhapur : कोल्हापुरात ओमायक्रोनची एन्ट्री, एक व्यक्ती पॉझिटिव्ह - ओमायक्रॉनचे कोल्हापूरमधील पेशंट

ओमायक्रॉन विषाणूने अखेर कोल्हापूरमध्ये शिरकाव केला आहे. आज दुपारच्या सुमारास कोल्हापुरात पहिला रुग्ण आढळून आला आहे. (Omicron Variant In Kolhapur District ) यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र, त्वरित उपाययोजना करत तो भाग सील करण्यात आला आहे. तर नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केली आहे.

आयुक्त कादंबरी बलकवडे
आयुक्त कादंबरी बलकवडे
author img

By

Published : Dec 30, 2021, 11:55 AM IST

Updated : Dec 30, 2021, 12:35 PM IST

कोल्हापूर - ओमायक्रॉन विषाणूने अखेर कोल्हापूरमध्ये शिरकाव केला आहे. आज दुपारच्या सुमारास कोल्हापुरात पहिला रुग्ण आढळून आला आहे. (Omicron Patient In Kolhapur District) यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. (Omicron Variant In Kolhapur District) मात्र, त्वरित उपाययोजना करत तो भाग सील करण्यात आला आहे. तर नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केली आहे.

माहिती देताना आयुक्त

ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट

आय.टी.आय (Patients of Omicron in ITI area In Kolhapur )परिसरातील एका कुटुंबातील चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. तर, यातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले होते. मात्र, खबरदारी म्हणून चारपैकी तिघांचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत (Omicron Patients In Maharashtra) ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आज (दि. 30 डिसेंबर)रोजी दुपारी त्यातील एका व्यक्तीचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये एका व्यक्तीस ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

ओमायक्रॉन या नवीन विषाणूची लागण झाल्याने सौम्य लक्षण दिसत होते

संबधित ओमायक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले होते. मात्र, संबधित रुग्णाला ओमायक्रॉन या नवीन विषाणूची लागण झाल्याने सौम्य लक्षण दिसत होते. (Municipal Commissioner Kadambari Balkwade) त्याच्या संपर्कात त्यांच्या घरातील ४ व्यक्ती होते. तर ४ ही व्यक्ती पॉझिटिव असून त्यातील दोघांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे. तसेच, एकाला ओमायक्रोनची लागण झाल्याचे डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले आहे. खबरदारी बनवून आजूबाजूच्या भागातील संपर्कात आलेल्या ३५ लोकांची सँपल घेतले असल्याचे देखील प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले आहे.

मागील 2 आठवड्यापूर्वी देखील 2 संशयित व्यक्ती आढळले

मागील दोन आठवड्यापूर्वी १३ व १४ डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलिया व नायझेरियातून आलेले 2 व्यक्ती जण ओमायक्रॉन संशयित आढळून आले होते. मात्र त्याचे स्वॅब पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यानंतर ते निगेटिव्ह आले होते. यामुळे कोल्हापूरवासियांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आज जिल्ह्यात ओमायक्रॉनने शिरकाव केला. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटाझरचा वापर करावा व लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे हे गरजेचे बनले आहे.

हेही वाचा - Kalicharan Maharaj Arrested : महात्मा गांधींबद्दल प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी कालीचरण महाराजाला बेड्या

Last Updated : Dec 30, 2021, 12:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.