ETV Bharat / state

कोल्हापुरात आणखी 172 रुग्णांची वाढ; एकूण अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1हजार 062

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 2 हजार 92 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 984 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 46 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे सद्यस्थितीत अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 62 इतकी आहे.

kolhapur corona update
कोल्हापुरात आणखी 172 रुग्णांची वाढ; एकूण अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1062
author img

By

Published : Jul 19, 2020, 12:48 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात आणखी 172 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 12 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. नवीन आढळलेल्या 172 रुग्णांनंतर सद्यस्थितीत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 1 हजार 62 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 2 हजार 92 झाली आहे. त्यातील 984 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण नगरपालिका क्षेत्रात 70 इतके आढळले आहेत. चंदगड तालुक्यातसुद्धा 34 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, मृत्यू झालेल्या दोन रुग्णांमध्ये इचलकरंजीमधील 66 वर्षांचा वृद्ध आणि जवाहरनगर येथील 54 वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत सर्वाधिक 18 मृत्यू एकट्या इचलकरंजी शहरातील आहेत.

आज अखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या -

आजरा- 97
भुदरगड- 83
चंदगड- 247
गडहिंग्लज- 150
गगनबावडा- 7
हातकणंगले- 70
कागल- 66
करवीर- 219
पन्हाळा- 83
राधानगरी- 84
शाहूवाडी- 221
शिरोळ- 58
नगरपरिषद क्षेत्र- 427
कोल्हापूर महापालिका क्षेत्र -240
असे एकूण 2052

इतर जिल्हा व राज्यातील 40 असे मिळून एकूण 2 हजार 92 रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे. जिल्ह्यातील एकूण 2092 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 984 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 46 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे सद्यस्थितीत अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1062 इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.