ETV Bharat / state

जवानांना गुलाब देऊन आमदार ऋतुराज पाटीलांनी साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे' - आमदार ऋतुराज पाटील सैनिकांसोबत व्हॅलेंटाईन डे

सर्वजण आपल्या प्रियजनांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. विशेषतः तरूणाई यात पुढे असलेली दिसत आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील आपला 'व्हॅलेंटाईन डे' अशाच पद्धतीने 'खास' प्रियजनांसोबत साजरा केला आहे.

आमदार ऋतुराज पाटील सैनिकांसोबत व्हॅलेंटाईन डे
mla ruturaj patil celebrate valentine day with soldiers
author img

By

Published : Feb 15, 2020, 3:26 AM IST

Updated : Feb 15, 2020, 5:37 AM IST

कोल्हापूर - आज (शुक्रवार) सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. विशेषतः तरूणाई यात पुढे असलेली दिसत आहे. अनेकांनी आपापल्या प्रियजनांसोबत आजचा दिवस एकत्रित घालवला. आजच्या या खास दिवसाचा आनंद घेतला. मात्र, कोल्हापूरातील काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी हा 'व्हॅलेंटाइन डे' जवानांसोबत साजरा केला.

हेही वाचा... ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: आता लखमापूर गावही पांघरणार उजेड, गावातच होईल मोबाईल चार्ज

सर्वत्र 'व्हॅलेंटाईन डे' दिवस साजरा होतो. मात्र,'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने, देशाच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या जवानांना त्यांच्या प्रिय व्यक्तींकडून थेट शुभेच्छा मिळत असतील का ? हा विचार ऋतुराज पाटील यांच्या मनात आला. त्यामुळे त्यांनी थेट कोल्हापूरातील मराठा बटालियन गाठले. यावेळी त्यांनी बटालियनमधील जवानांना गुलाबाची फुले देऊन त्यांची गळाभेट घेतली. शिवाय त्यांना 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा दिल्या.

आपल्या देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या या जवानांबद्दल आपल्याला प्रेम आणि आदर नेहमीच असतो. त्याच जवानांप्रती असलेले प्रेम आजच्या या खास दिवसा निमित्त पाटील यांनी वेगळ्या पद्धतीने व्यक्त केले.

Last Updated : Feb 15, 2020, 5:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.