ETV Bharat / state

MLA Nitesh Rane : आमदार नितेश राणे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

आमदार नितेश राणे यांना सी.पी.आर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळला आहे. दरम्यान, राणे यांना फोंडा घाटमार्गे ओरस इथल्या हॉस्पिटलला नेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (MLA Nitesh Rane) सध्या सीपीआर रुग्णालय परिसरात राणे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

MLA Nitesh Rane : आमदार नितेश राणे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
MLA Nitesh Rane : आमदार नितेश राणे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
author img

By

Published : Feb 10, 2022, 9:37 AM IST

Updated : Feb 10, 2022, 1:40 PM IST

कोल्हापूर - आमदार नितेश राणे यांना सी.पी.आर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळला आहे. दरम्यान, राणे यांना फोंडा घाटमार्गे ओरस इथल्या हॉस्पिटलला नेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (MLA Nitesh Rane) सध्या सीपीआर रुग्णालय परिसरात राणे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने कोठडी सुनावली गेली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समोर आल्याने त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नितेश राणेंची प्रकृती जास्त बिघडल्याने आणि त्यांना पाठीचा आणि मानेचा तसेच छातीचा त्रास होत असल्याने नितेश राणे यांना कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी ऍडमिट करण्यात आले. त्यांना पाठीचे दुखणे , छातीत दुखत होते. मात्र काल उच्चरक्तदाब , चक्कर येणे , उलट्या होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र रात्रीतून नितेश राणे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने आज त्यांना सीपीआर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. नितेश राणे पुढील उपचारासाठी ओरोस येथील हॉस्पिटलला रवाना झाले.

आज सकाळपासूनच आमदार नितेश राणे यांना घेऊन जाण्यासाठी कार्यकर्ते सीपीआर रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे पोलिस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली होती. आमदार नितेश राणे आणि राकेश परब यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी तत्काळ जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अर्ज दाखल करून घेतल्यानंतर वकील संग्राम देसाई यांनी आपली बाजू मांडली होती. त्यावर न्यायालयाने शनिवारी दुपारी यावर सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आमदार राणेंचे वकील सतीश मानेशिंदे, संग्राम देसाई शनिवारी दुपारी न्यायालयात हजर झाले होते. परंतु या प्रकरणी शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करीत बचाव पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात जो अर्ज दाखल केलेला आहे, त्या अर्जावर या न्यायालयात ही सुनावणी न घेता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्याची मागणी केली होती. परंतु, सरकारी वकील घरत यांनी केलेल्या अर्जावर स्वाक्षरी नव्हती. तो विहित नमुन्यात नव्हता. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्याची मागणी आमदार राणे यांच्या वकिलांनी केली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज परिपूर्ण करण्यास मुदत देण्यात आली होती. तरीही वकील घरत यांनी त्रुटी दूर केल्या नाहीत. त्यानंतर हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात देण्यात आला. यावेळी या न्यायालयाने जामीन अर्जावर सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होईल. तसेच विशेष सरकारी वकिलांनी दिलेल्या अर्जातील त्रुटी दूर करण्यास सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ दिला होता. दरम्यान लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. या पार्श्वभूमीवर राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आला. सोमवारी सार्वजनिक सुट्टी राज्य सरकारने जाहीर केली. त्यामुळे ही सुनावणी मंगळवारी घेण्यात आली होती. काल दुपारी कोर्टात सुनावणी पार पडली असून आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Last Updated : Feb 10, 2022, 1:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.