कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचे भाषण केले नाही, त्यांनी शिमग्याचे भाषण केले. इतर प्रश्नांवर न बोलता केवळ भाजप हाच मुद्दा घेऊन ते विरोधकांना शिव्या-शाप देण्याची भाषा करत होते, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. आज ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
काय म्हणाले होते दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी देखील दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाषण केले. हा कार्यक्रम नागपूर येथे झाला. त्यात त्यांनी हिंदुत्व काय आहे ते समजून सांगितले आहे. आमच्यावर हिंदुत्वाच्या नावाने प्रश्न उपस्थित करणाऱ्या आरएसएसच्या राजकीय शाखेने भागवत यांनी जे हिंदुत्व सांगितले तेच हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांचेही आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चालत असल्याने आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. भाजपने हिंदुत्व समजून घ्यावे, असे ठाकरे म्हणाले होते.
हेही वाचा - पन्हाळ्यात शिक्षकाला दमदाटी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल