ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष - शासनाच्या वेबसाईटवर अंबाबाई मंदिर आणि जुना राजवाड्यासंदर्भात चुकीची माहिती - कोल्हापूर लेटेस्ट न्यूज

महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर अंबाबाई मंदिर तसेच जुन्या राजवाड्याबद्दल चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जुना राजवाड्यामध्ये शाहू महाराजांचे थडगे आहे, शिवाय अंबाबाईच्या मूर्तीमध्ये हीरक नावाचा धातू मिसळला आहे. ज्याच्यामुळे मूर्तीवर प्राचीन काळापासून प्रकाश फेकला जातो अशी चुकीची माहिती देण्यात आली आहे. आता ही माहिती वेबसाइटवरून तात्काळ हटविण्याची मागणी होत आहे.

वेबसाईटवर अंबाबाई मंदिर आणि जुना राजवाड्यासंदर्भात चुकीची माहिती

author img

By

Published : Mar 22, 2021, 8:10 PM IST

कोल्हापूर - महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर अंबाबाई मंदिर तसेच जुन्या राजवाड्याबद्दल चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जुना राजवाड्यामध्ये शाहू महाराजांचे थडगे आहे, शिवाय अंबाबाईच्या मूर्तीमध्ये हीरक नावाचा धातू मिसळला आहे. ज्याच्यामुळे मूर्तीवर प्राचीन काळापासून प्रकाश फेकला जातो अशी चुकीची माहिती देण्यात आली आहे. आता ही माहिती वेबसाइटवरून तात्काळ हटविण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या kolhapur.gov.in या वेबसाईटवर कोल्हापूर जिल्ह्याची महत्त्वाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे आणि ठिकाणांची सविस्तर माहितीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र यामधील काही माहिती चुकीची प्रसिद्ध करण्यात आली आहे. पन्हाळा गडासंदर्भात सुद्धा या वेबसाईटवर अनेक चुकीचे संदर्भ देण्यात आले आहेत. सर्वात गंभीर चूक म्हणजे यामध्ये कोल्हापूरातील जुना राजवड्यामध्ये शाहू महाराजांचे थडगे आहे अशी माहिती देण्यात आली आहे. खरंतर जुना राजवाड्यामध्ये छत्रपती घराण्याचे आता देवघर आहे. याच ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे या ठिकाणाला खूप मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. असे असताना या ठिकाणाबाबत शासनाच्या वेबसाईटवर चुकीची माहिती देणे म्हणजे खूप मोठी गंभीर चूक आहे. जुना राजवाड्याबरोबरच लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिराबाबत सुद्धा या वेबसाईटवर चुकीची माहिती देण्यात आली आहे. अंबाबाईची मूर्ती हिरक धातूपासून बनविण्यात आली आहे. ज्याच्यामुळे मूर्तीवर प्राचीन काळापासून प्रकाश फेकला जातो. मूर्तीच्या डाव्या हातात तलवार आहे असाही चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे.

वेबसाईटवर अंबाबाई मंदिर आणि जुना राजवाड्यासंदर्भात चुकीची माहिती

वेबसाईटवरून माहिती हटवण्याची मागणी

शासनाच्या वेबसाईटवरच आशा प्रकारे गंभीर चुका झाल्या आहेत. ही माहिती मुद्दामहून खोडसाळपणे दिली आहे का? अशी शंका येत असून माहिती तात्काळ वेबसाईटवरून काढण्यात यावी अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली आहे. अशा पद्धतीने चुकीची माहिती लिहिताना संबंधित व्यक्ती शुद्धीवर होते का असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. खरंतर कोट्यवधी लोकांपर्यंत शासनाच्या वेबसाईटद्वारे माहिती जात असते, तेंव्हा अशी माहिती प्रसिद्ध करताना काळजी घेतली जावी, असं सावंत यांनी म्हटले आहे.

'शासनाच्या वेबसाईटवर चुकीची माहिती का, कोणी आणि कशासाठी दिली ? '

एकीकडे करवीर निवसानी अंबाबाई मंदिराबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर आणि योग्य माहिती दिली आहे. शिवाय नेहमीच्या कार्यक्रमांची सुद्धा इतंभूत माहिती देण्यात आली आहे. मात्र शासनाच्या वेबसाईटवर चुकीची माहिती दिल्याबाबत समजले त्यामुळे ही माहिती का, कोणी आणि कशासाठी दिली असा सवाल उपस्थित होत असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हंटले आहे. शिवाय ही चुकीची माहिती तात्काळ हटविण्यात यावी असेही त्यांनी म्हंटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.